डेट्रॉइट (अमेरिका) : हॉलिवूड चित्रपटात नेहमी हवेतून उडताना दिसणारी बाइक आता प्रत्यक्षात दिसू लागणार आहे. डेट्राइटमध्ये भरलेल्या ऑटो शोमध्ये जपानी स्टार्टअप कंपनीने बनविलेली हॉवरबाइक शनिवारी सादर करण्यात आली.
१०० किलोमीटर प्रतितास वेगाने उडू शकणारी ही बाइक पेट्रोलवर चालते. सध्या ही बाइक फक्त जपानमध्ये विकत मिळते. अमेरिकेत २०२३ मध्ये विक्री सुरू होणार आहे. तर भारतात खरेदीसाठी २०२५ पर्यंत वाट पाहावी लागेल. बाइकची अंदाजे किंमत ६.१९ कोटी रुपये इतकी आहे.