युद्धाला जाण्यापूर्वी सैनिकांचे गोठवताहेत स्पर्म; युक्रेन सरकारचा निर्णय, रशियाकडून हल्ल्यांत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 10:21 AM2023-01-11T10:21:52+5:302023-01-11T10:25:01+5:30

रशिया-युक्रेन युद्धाला आता एक वर्ष पूर्ण होण्यास काही दिवस उरले आहेत.

The Ukrainian government has launched a campaign to freeze the sperm of soldiers going to war. | युद्धाला जाण्यापूर्वी सैनिकांचे गोठवताहेत स्पर्म; युक्रेन सरकारचा निर्णय, रशियाकडून हल्ल्यांत वाढ

युद्धाला जाण्यापूर्वी सैनिकांचे गोठवताहेत स्पर्म; युक्रेन सरकारचा निर्णय, रशियाकडून हल्ल्यांत वाढ

Next

कीव्ह : रशिया-युक्रेन युद्धाला आता एक वर्ष पूर्ण होण्यास काही दिवस उरले आहेत. याच वेळी युक्रेन सरकारने युद्धावर जाणाऱ्या सैनिकांचे शुक्राणू (स्पर्म) गोठवण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यासाठी सैनिकांना प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे युद्धानंतर सैनिक जखमी होऊन घरी परतले नाहीत तरी त्यांना त्यांचा वंश पुढे नेण्यासाठी मदत होणार आहे.

ज्या महिलेकडे आपल्या मृत पतीचे शुक्राणू आहेत, त्या हे शुक्राणू २० वर्षांपर्यंत कधीही वापरू शकतात. सुमारे ४० टक्के सैनिकांनी त्यांचे शुक्राणू गोठवण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर सैनिकांच्या पत्नीही यासाठी मोहीम राबवत आहेत.

रशियाकडून हल्ले वाढ

रशियाने युक्रेनच्या बखमुत शहराभोवतीच्या ठिकाणांवर हल्ल्यांत मोठी वाढ केली आहे. सर्व काही नष्ट झाले आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले.

Web Title: The Ukrainian government has launched a campaign to freeze the sperm of soldiers going to war.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.