गेल्या काही दिवसापासून इस्त्रायल आणि हमास यांच्यातील तमाव वाढत आहे. यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. आता अनेक देशांनी इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, इस्रायलच्या समर्थनार्थ ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी इस्रायलला मदत करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून पूर्व भूमध्य समुद्रात पाळत ठेवणारी विमाने आणि दोन रॉयल नेव्ही जहाजे पाठवण्याबाबत बोलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान दहशतवादी गटांना शस्त्रे हस्तांतरित करण्यासारख्या प्रादेशिक स्थिरतेला निर्माण होणाऱ्या धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आजपासून गस्त घालण्यास सुरुवात करेल.
हसू अन् अश्रू... इस्रायलमधून पहिलं विमान दिल्लीत दाखल, मायभूमीत उतरल्याचा अत्यानंद
याशिवाय इस्रायलसाठी ब्रिटनच्या मदत पॅकेजमध्ये पाळत ठेवणारी मालमत्ता, हेलिकॉप्टर, P8 विमाने आणि मरीन कंपनीचाही समावेश आहे. पीएम सुनक म्हणाले की, ते इस्रायलच्या समर्थनात आहेत, म्हणूनच पूर्व भूमध्य समुद्रात ब्रिटिश मालमत्ता तैनात केल्या जात आहेत.
हमासच्या हल्ल्यानंतर ब्रिटनचे पीएम सुनक यांची ही घोषणा इस्रायलसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या युद्धादरम्यान ब्रिटनची मदत हमाससाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. यासोबतच ब्रिटनने इतर मदत पॅकेजही जाहीर केले आहेत.
पीएम सुनक म्हणाले की, हमासला पुढे येण्यापासून रोखले जाईल. ब्रिटीश ससस्त्र बल इस्त्रायल आणि क्षेत्रात व्यावहारीक समर्थन देण्यासाठी तयार आहे. मानवतावादी प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी रॉयल नेव्ही टास्क ग्रुप पुढील आठवड्यात या भागात हलविला जाईल.
इस्रायलमध्ये घडलेल्या भीषण दृश्यांची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री करण्यासाठी सरकारने स्पष्ट असले पाहिजे, असंही पीएम सुनक म्हणाले. संपूर्ण प्रदेशातील आमचे लष्करी आणि राजनयिक संघ हमास दहशतवाद्यांच्या या क्रूर हल्ल्यात बळी पडलेल्या हजारो निष्पापांना सुरक्षा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि मानवतावादी मदत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांना देखील पाठिंबा देतील. त्यांनी इस्रायल, सायप्रस आणि संपूर्ण प्रदेशात लष्करी पथके बळकट करण्याचेही आवाहन केले.