दक्षिण कोरियाचे जपान आणि अमेरिकेसोबत संबंध वाढले आहेत. या संबंधावर आता उत्तर कोरियाच्या किम जोंग उन यांनी मोठं विधान करत आपल्या देशासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. दक्षिण कोरिया आणि जपानसोबत अमेरिकेची वाढती सुरक्षा भागीदारी उत्तर कोरियासाठी गंभीर धोका निर्माण करत आहे, असं किम जोंग उम म्हणाले. रविवारी सरकारी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत त्यांनी ही माहिती दिली.
किम यांनी यापूर्वीही अशाच प्रकारचे इशारे दिले आहेत. ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्याची आणि नजीकच्या भविष्यात राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याची ऑफर स्वीकारणार नाहीत, असं सांगण्यात येत आहे.
आतिशी यांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा, उपराज्यपालांनी विधानसभा केली बरखास्त
सरकारी कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनुसार, शनिवारी कोरियन पीपल्स आर्मीच्या ७७ व्या स्थापना वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या भाषणात किम जोंग म्हणाले की, उत्तर अटलांटिक करार संघटना सारखी प्रादेशिक लष्करी संघटना निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या कटाचा भाग म्हणून स्थापित केलेली अमेरिका-जपान-दक्षिण कोरिया त्रिपक्षीय सुरक्षा भागीदारी कोरियन द्वीपकल्पात लष्करी असंतुलन निर्माण करत आहे. ही भागीदारी आपल्या देशाच्या सुरक्षा परिस्थितीसमोर एक गंभीर आव्हान निर्माण करत आहे.
केसीएनएच्या माहितीनुसार, त्यांनी पुन्हा एकदा अणुकार्यक्रमावर पुढे जाण्याचे धोरण स्पष्ट केले. आण्विक शक्तींसह सर्व प्रतिबंधक प्रणाली जलदगतीने मजबूत करण्याच्या नवीन योजनांचा उल्लेख केला. शुक्रवारी जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले होते की, आम्ही उत्तर कोरिया आणि किम जोंग उन यांच्याशी संबंध कायम ठेवू. तुम्हाला माहिती आहेच, माझे त्यांच्याशी खूप चांगले संबंध होते.
डोनाल्ड ट्रम्प किम जोंग उन यांची भेट घेणार
२३ जानेवारी रोजी 'फॉक्स न्यूज'वर प्रसारित झालेल्या मुलाखतीदरम्यान ट्रम्प यांनी किम जोंग उन यांचे वर्णन एक बुद्धिमान व्यक्ती म्हणून केले होते आणि ते धार्मिक कट्टर नाहीत असे म्हटले होते. किम यांच्याशी पुन्हा संपर्क साधणार का असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, "हो, मी करेन." २०१८-१९ मध्ये ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा अणुकार्यक्रम संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी किम जोंग उन यांची तीन वेळा भेट घेतली होती.