वॉशिंग्टन : पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास ७५ टक्क्यांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी स्पर्धेत असलेल्या अमेरिकन-भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामी यांनी केली. त्याशिवाय एफबीआयसह अन्य सरकारी संस्थाही बंद करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
रामास्वामी म्हणाले, राष्ट्राध्यक्ष झाल्यावर पहिल्या दिवसापासूनच नोकरकपातीला सुरुवात केली जाईल. वर्षभरात सरकारी नोकरदारांची संख्या ५० टक्क्यांनी कमी केली जाईल. एकूण सरकारी कर्मचाऱ्यांपैकी ३० टक्के कर्मचारी पुढील ५ वर्षांमध्ये निवृत्त होतील, तर ४ वर्षांमध्ये एकूण २२ लाख कर्मचाऱ्यांपैकी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जाईल. कॉर्पोरेट कंपनीच्या कार्यपद्धतीनुसार सरकारी कामकाज करण्यावर आमचा भर असेल, असे रामास्वामी म्हणाले. अमेरिकेत एकूण सरकारी कर्मचारी २२.५० लाख आहेत..