...तर अण्वस्त्रे वापरू! पुतिन यांची अमेरिकेला धमकी; PM मोदींमुळे थांबले अणुयुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:43 AM2024-03-14T05:43:16+5:302024-03-14T05:43:36+5:30
२०२२मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये अणुयुद्ध भडकू शकले असते. रशियाने हल्ल्याची याेजना आखली हाेती. बायडेन प्रशासन चिंतित हाेते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे अणुयुद्ध टळले.
माॅस्काे : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेला अण्वस्त्रहल्ल्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने त्यांचे सैनिक युक्रेनमध्ये पाठविल्यास युद्ध आणखी भीषण हाेईल. आम्ही अणुयुद्धाच्या दिशेने गेलेलाे नाही. मात्र, आम्ही त्यासाठी तयार आहाेत, असे पुतिन यांनी स्पष्ट केले.
रशियन वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पुतिन म्हणाले की, अण्वस्त्रे ही वापरण्यासाठीच आम्ही तयार केली आहेत. रशियाचे अस्तित्व धाेक्यात आल्यास आम्ही आत्मरक्षणासाठी अण्वस्त्रांचा वापर करू. आम्ही युक्रेनसाेबत पूर्ण गांभीर्याने चर्चेसाठी तयार आहाेत, असेही पुतिन म्हणाले. अमेरिकेने अणुचाचणी केली तर रशियादेखील करेल, असेही पुतिन यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
९० टक्के अण्वस्त्रे अमेरिका आणि रशियाकडे आहेत.
माेदींमुळे थांबले अणुयुद्ध
‘सीएनएन’ने यापूर्वी दावा केला हाेता की, २०२२मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये अणुयुद्ध भडकू शकले असते. रशियाने हल्ल्याची याेजना आखली हाेती. त्यावेळी बायडेन प्रशासन चिंतित हाेते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे अणुयुद्ध टळले.