शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

...तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू; रशियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 9:05 AM

आता युद्ध थेट रशियात पोहोचले आहे, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी दिला. रशियाची राजधानी मॉस्को येथे ड्रोन हल्ल्यानंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाच्या भूमीवर हल्ले होण्याच्या घटना घडणारच होत्या. दोन देशांमधील युद्धात अशा घटना होणे स्वाभाविक आहे. 

मॉस्को : नाटो देशांचा पाठिंबा असलेल्या युक्रेनने रशियाच्या काही भूभागावर कब्जा केला तर आम्ही शत्रूवर अण्वस्त्र हल्ला करू शकतो, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमीत्री मेदवेदेव यांनी दिला आहे. 

त्यांनी सांगितले की, युक्रेनने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांत रशियाचा भूभाग जिंकून घेतला तर आम्ही अण्वस्त्र हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यावेळी आमच्यासमोर कोणताही अन्य पर्याय असणार नाही. अणुयुद्ध होऊ नये, अशी आमचीही इच्छा आहे. मात्र तशी परिस्थिती उद्भवली तर रशिया ठाम निर्णय घेण्यास सक्षम आहे. 

आता युद्ध रशियात पोहोचले - जेलेन्स्कीआता युद्ध थेट रशियात पोहोचले आहे, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी दिला. रशियाची राजधानी मॉस्को येथे ड्रोन हल्ल्यानंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाच्या भूमीवर हल्ले होण्याच्या घटना घडणारच होत्या. दोन देशांमधील युद्धात अशा घटना होणे स्वाभाविक आहे. 

युक्रेनचे तीन ड्रोन पाडल्याचा रशियाच्या लष्कराने रविवारी दावा केला. युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियानेही युक्रेनवर हल्ला केला. यात इमारतींचे मोठे नुकसान झाले.

युरोपने दिला चीन, रशियाला इशारा-  युरोपियन युनियनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी सोमवारी वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रावरील बीजिंगचा दावा अमान्य केला. 

-  यासाठी त्यांनी २०१६ च्या युरोपियन युनियन लवादाच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. युक्रेन किंवा हिंद-प्रशांत महासागर, युरोप आक्रमकता सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी रशिया, चीनला दिला.

हुकूमशाही नेते कोणत्याही धोक्याची पर्वा न करता युक्रेनवर आक्रमण करत आहेत. रशियाच्या युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय नियमांचा पायाच हादरला आहे. हे युरोपियन युनियनच्या नियमांचे उल्लंघन आहे. त्यामुळे युरोप आक्रमक रशियाच्या विरोधात युक्रेन करत असलेल्या प्रतिहल्ल्याचे समर्थन करतो.- उर्सुला वॉन डेर लेन, अध्यक्षा, युरोपियन युनियन

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्ध