वॉशिंग्टन : रोजगारांचा विचार करता भारतात महिलांवर अनेक प्रकारचे निर्बंध असून, लैंगिक शोषणापासून संरक्षण देणारा एकही कायदा नसल्याचे विश्व बँकेच्या एका ताज्या अहवालात म्हटले आहे.भारत हा आशियातील एक आघाडीची अर्थव्यवस्था मानला जातो. या पार्श्वभूमीवर बँकेचा हा अहवाल आला आहे. या अहवालात म्हटले आहे की, नोकऱ्यांच्या बाबतीत महिलांवर अनेक निर्बंध आहेत.खाण किंवा तत्सम क्षेत्रात महिलांना नोकरी करू दिली जात नाही. या क्षेत्रात मर्यादेपेक्षा जास्त वजन उचलावे लागते. महिला काच उत्पादन करणाऱ्या कारखान्यातही काम करू शकत नाहीत.जीवन, आरोग्य आणि नैतिकतेसंबंधी धोका असणाऱ्या क्षेत्रातही महिलांना नोकरी करू दिली जात नाही.ब्रिटिश राजवटीत लागू असलेल्या कायद्यांची अजूनही जशीच्या तशी अंमलबजावणी हे त्याचे एक कारण असल्याचे अहवाल म्हणतो. सार्वजनिक ठिकाणी लैंगिक शोषण रोखण्यासाठी कोणताही कायदा नाही. जगातील अन्य १८ प्रमुख अर्थव्यवस्थेत असा कायदा आहे, असे हा अहवाल म्हणतो. गेल्या दोन वर्षांत भारताने अन्य क्षेत्रात सुधारणा केल्याचे हा अहवाल म्हणतो.
रोजगारांच्या बाबतीत भारतात महिलांवर अजूनही अनेक निर्बंध
By admin | Published: September 12, 2015 3:49 AM