शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 7:04 PM

बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची होती

PM Narendra Modi - Muhammad Yunus: संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यात कोणतीही बैठक होणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. बांगलादेशचे ( Bangladesh ) परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहीद हुसेन यांनी शनिवारी सांगितले की देशाचे मुख्य सल्लागार प्रोफेसर युनूस हे भारताचे ( India ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बैठक करणार नाहीत. पंतप्रधान मोदी UNGA साठी पोहोचण्यापूर्वीच युनूस हे त्यांच्या ५७ सदस्यीय शिष्टमंडळासह न्यूयॉर्कला रवाना होतील असे बांगलादेशकडून सांगण्यात आले. पीटीआयच्या वृत्तानुसार, परराष्ट्र व्यवहार सल्लागार पुढे म्हणाले की संयुक्त राष्ट्र महासभेच्या वेळी भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत युनूस द्विपक्षीय बैठक करणार आहेत.

बांगलादेशला भारतासोबतचे संबंध परस्पर आदर आणि निष्पक्षतेच्या आधारावर त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करून पुढे नेण्याची इच्छा आहे. मंगळवारी त्यांचे शिष्टमंडळ ढाका येथून रवाना होणार असल्याचे हुसेन यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत जेव्हा हुसैन यांना माध्यमांनी विचारले की, अंतरिम सरकारने दिलेल्या वक्तव्यामुळे भारतीय पंतप्रधानांसोबतची बैठक होऊ शकली नाही, तेव्हा ते म्हणाले की, सर्वोच्च भारतीय नेत्यांनी टिप्पणी केली असली तरीही तसे काहीही नाही. कमेंट्स, लाइक किंवा डिसलाइक करणे हा फारसा मोठा मुद्दा नाही. आपण आपले शेजारी देश बदलू शकत नाही, परंतु परस्पर सौहार्द आणि चांगल्या संबंधाने मैत्री नक्कीच वाढवू शकतो.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी अमेरिकेला रवाना झाले. परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान म्हणाले की क्वाड (चतुर्थांश सुरक्षा संवाद) हा इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी काम करणारा एक प्रमुख गट म्हणून उदयास आला आहे. क्वाडमध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान डेलावेअरमधील विल्मिंग्टन क्वाड समिटमध्ये सहभागी होतील. याचे यजमानपद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भूषवणार आहेत.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानBangladeshबांगलादेशIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिका