शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

युरोपीय देशांमध्ये एकमत नाही

By admin | Published: September 16, 2015 12:55 AM

सीरियन स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ब्रुसेल्स येथे घेतलेली बैठक अखेर निष्फळ ठरली. युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांनी यामध्ये सहभाग घेतला.

ब्रुसेल्स : सीरियन स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ब्रुसेल्स येथे घेतलेली बैठक अखेर निष्फळ ठरली. युरोपियन युनियनच्या सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांनी यामध्ये सहभाग घेतला. मात्र युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जीन क्लाऊड जंकर यांनी सुचविलेल्या प्रस्तावावर एकमत झाले नाही. शेवटच्या क्षणापर्यंत युरोपातील अनेक देशांच्या विविध नेत्यांच्या भेटी घेऊनही जंकर यांना त्यावर एकमत मिळविण्यात यश आले नाही.मागील आठवड्यात जीन क्लाऊड जंकर यांनी १ लाख २० हजार स्थलांतरितांना विविध देशांमध्ये स्वीकारण्यासाठी एक प्रस्ताव तयार केला होता. त्यामध्ये त्या देशाची लोकसंख्या, तेथील बेकारीचा दर आणि सकल घरेलू उत्पादन यांचा विचार करून किती स्थलांतरितांना स्वीकारायचे, हे ठरणार होते. मात्र बळजबरीने स्थलांतरितांना स्वीकारणार नाही, अशी आग्रही भूमिका अनेक देशांनी घेतली आणि त्याचेच प्रतिबिंब काल सोमवारी बु्रसेल्स बैठकीमध्ये दिसून आले. गेल्या दोन दिवसांमध्ये स्थलांतरितांच्या प्रश्नावर युरोपातील देश पुन्हा नकारात्मक भूमिकेत गेल्याचे दिसून येत आहे. म्युनिचवर येणारा लोंढ्याच्या ताणाचा विचार करून जर्मनीने आॅस्ट्रियाच्या बाजूच्या सीमेवर बंधने लादण्याचा निर्णय घेतला. तर आॅस्ट्रियानेहीदेखील हीच भूमिका घेतली आहे. नेदरलँडस, स्लोव्हाकिया आणि पोलंडने स्थलांतरितांना स्वीकारण्याची सक्ती मान्य करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.रशियाची मदतसीरियातील युद्ध शमविण्याऐवजी रशियाने आपली तोफांची, दारूगोळ्यांची मदत सुरूच ठेवली आहे, सीरियातील लॅटकिया येथे रशियाने आपली मदत पुन्हा पाठविल्याची माहिती प्रकाशात येत आहे. रशियाच्या या भूमिकेवर अमेरिकेने जाहीर चिंता व्यक्त केली; मात्र रशिया सीरियाच्या मागे आतापर्यंतच तरी उभा राहिल्याचे दिसून येते.कॅमेरून लेबनॉनमध्येजॉर्डन आणि लेबनॉनमध्ये गेलेल्या सीरियन स्थलांतरितांच्या शिबिरांची माहिती घेण्यासाठी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी बैरुत आणि अम्मानचा दौरा केला. सीरियन मुलांच्या शिक्षणाची व शिबिराची माहिती घेऊन ब्रिटनने जाहीर केलेल्या १३७ दशलक्ष युरोच्या वापराबद्दल सूचना दिल्या.बोट बुडून २२ मृत्युमुखी। तुर्कस्थानातून ग्रीसमध्ये एजियन समुद्रमार्गे जाणाऱ्या बोटीला अपघात होऊन त्यात २२ जणांचा मृत्यू झाला आहे. कॉस बेटाकडे जाणारी ही बोट ६६ फूट इतकी मोठी होती़ त्यातील २०० जणांना वाचविण्यात यश आले आहे; तर ग्रीसच्या फार्माकोन्सी येथे जाणाऱ्या बोटीस रविवारी अपघात होऊन ३४ लोकांचे प्राण गेले आहेत.हंगेरीमध्ये आणीबाणीसीरियन एक्झोडसच्या प्रवासात सर्वांत मोठा चिंतेचा टप्पा आला आहे तो हंगेरीमध्ये़ या वर्षभरामध्ये या लहानशा देशात स्थलांतरितांच्या येण्यामुळे अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये सर्बिया- हंगेरी सीमेवर तणाव निर्माण झाल्यानंतर हंगेरीने अंतर्गत आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थलांतरितांना रोखण्यासाठी हंगेरीने आपल्या सीमांवर कुंपण घालण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर कारावासाची शिक्षा ठोठावणारे नियमही केले; मात्र लोंढ्यांमुळे हा प्रश्न वाढतच गेला.आता आणीबाणी लागू केल्यानंतर सर्बिया सीमेवरील तारांचे कुंपण ओलांडणाऱ्यांना पकडण्याचा अधिकार हंगेरीयन पोलिसांना मिळाला आहे.