मॉस्को - फिफा विश्वचषक 2018 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोमांचक लढत पाहायला मिळाली. रशियाच्या धरतीवर फ्रान्स आणि क्रोएशियन खेळाडूंचा थरार जगाने अनुभवला. या रोमहर्षक लढतीत 4-2 अशा फरकाने फ्रान्सने विजय मिळवला. या विजयानंतर फ्रान्स संघावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. फ्रान्स खेळाडूंनीही तितक्याच जल्लोषात विजयानंद साजरा केला. त्याचवेळी मैदानात चक्क वरुणराजानेही हजेरी लावत दोन्ही संघांचे अभिनंदन केले. तर, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भर पावसात विजयी खेळाडू्ंना विश्वचषक सुपूर्द केला. मात्र, बक्षिस सोहळ्यात त्यांच्या डोक्यावरील छत्री सर्वांचे आकर्षण ठरली.
फिफा विश्वचषक 2018 स्पर्धेत तब्बल 20 वर्षानंतर फ्रान्सने विश्वविजयाला गवसणी घातली. फ्रान्सने 4-2 अशा फरकाने सामना जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. या विश्वसोहळ्याच्या बक्षिस वितरणावेळी जगभरातील दिग्गजांनी व्यासपीठावर हजेरी लावली होती. त्यावेळी अनेक देशांच्या प्रमुखांनीही पावसात मनुरादपणे भिजण्याचा आनंद घेतला. पण, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या डोक्यावरील छत्री हालू दिली नाही. या सोहळ्यात पावसापासून बचाव करण्यासाठी व्लादिमीर पुतीन यांच्या डोक्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी छत्री धरल्याचे दिसत आहे.
ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट- पुतीन यांच्या छत्रीने फिफा विश्वचषकातील बक्षिस वितरण सोहळ्याची शोभा घालवली.
एका ट्विटर युजर्सचा खोचक सवाल ?
ही माझी छत्री आहे माझी, तुमची नाही. तुम्ही फ्रेंचवाले पहिलं पावसात भिजा जा.