न्यूयॉर्क : नासाने मंगळ ग्रहावरील खोऱ्यातील अत्यंत गुंतागुंतीच्या मातीच्या थरांचे हाय डेफिनिशन छायाचित्र प्रसिद्धीस दिले आहे. या छायाचित्रावरून मंगळवार कधी काळी पाणी वाहिले होते याचा आणखी एक पुरावा उपलब्ध झाला आहे. मंगळवरील मार्गारिटी सायनस क्वॅड्रँगलमध्ये उझबोई व्हॅलीस आहे व हे खोरे या ग्रहावर पाणी होते, असे समजले जाते त्या पाण्यातून ती अस्तित्वात आली. या खोऱ्यातून पाणी वाहणे दोन फार मोठ्या वस्तुंची एकमेकांशी धडक झाल्यामुळे बंद पडले व मंगळवार होल्डन विवर जन्मले. काळ जसा पुढे सरकत गेला तसे खोऱ्यातील पाण्याची पातळी एवढी वाढली की ती विवराच्या वरच्या भागावरून वाहून सरोवरात आली. पाण्याच्या या प्रवासाने जे थर जमा झाले होते त्यांची खूप झीज झाली. अर्थात त्यातील काही थर हे पाण्याच्या या प्रवाहालाही तोंड देऊ शकल्यामुळे त्यांची झीज झाली नाही व ते आज अखंडीत दिसतात.नासाच्या अत्यंत शक्तिशाली व हाय डेफिनिशन उपकरणांनी या थरांचा उत्कृष्ट असा तपशील टिपला आहे. खोऱ्यामधील पुराची जी विविधता दिसते त्यावरून माती आजुबाजुच्या भागांतून वाहून गेली असे सूचित होते. या महिन्याच्या प्रारंभी युरोपियन स्पेस एजन्सीनेदेखील मंगळवार फार मोठ्या प्रमाणावर साधारण तीन अब्ज वर्षांपूर्वी पूर आल्याचे सूचित होते, असे म्हटले होते. हे सूचित करणारे अवशेष एजन्सीच्या मंगळवरील मार्स एक्स्प्रेस या हाय डेफिनिशन कॅमेऱ्याने टिपले होते. (वृत्तसंस्था)
मंगळावर कधी काळी पाणी होते; मिळाले पुरावे
By admin | Published: March 20, 2017 12:47 AM