जगभरात दरवर्षी लाखो मेट्रिक टन प्लास्टीक तयार होते. निम्म्या प्लास्टीकचा पुनर्वापर होतो, जाळला जातो किंवा मोठा खड्डा खणून पुरला जातो, परंतु जे प्लास्टीक उरते, त्याचा मोठा भाग अखेरीस महासागरांमध्ये जातो. खरं तर हा उर्वरित कचरा इतका आहे की अमेरिकेच्या हवाई आणि कॅलिफोर्नियादरम्यान प्रशांत महासागरात हा कचरा एकत्र येऊन फ्रान्सहून तिप्पट आकाराचा ढीग साचत आहे.
सर्वाधिक प्लास्टिक कचरा उद्याने, समुद्रकिनारे किंवा रस्त्याकडेच्या नाल्यांमधून वाहून नद्यांत येतो.
नद्यांचे रूपांतर प्लास्टिकच्या ‘हायवे’मध्ये होते आणि सर्व प्लास्टिक महासागरात वाहून येते.
समुद्रातील प्लास्टिकचा मोठा अतिरिक्त भाग खराब झालेल्या मासेमारीच्या जाळ्यांमधूनही येतो. काहींना असे वाटेल की, जे देश सर्वाधिक प्लास्टिकचे उत्पादन किंवा वापर करतात तेच महासागरांना सर्वाधिक प्रदूषित करतात, पण ते खरे नाही.
अभ्यासानुसार, लहान भौगोलिक क्षेत्र, लांब किनारपट्टी, जास्त पर्जन्यमान आणि खराब कचरा व्यवस्थापन प्रणाली असलेल्या देशांमध्ये प्लास्टिक समुद्रात येण्याची अधिक शक्यता असते. उदाहरणार्थ, मलेशियाच्या तुलनेत चीन १० पट प्लास्टिक कचरा निर्माण करतो. तथापि, चीनच्या ०.६% च्या तुलनेत मलेशियाच्या एकूण प्लास्टिक कचऱ्यापैकी ९% महासागरात पोहोचतो, असा अंदाज आहे.
थायलंड २२,८०६, बांगलादेश २४,६४०, व्हिएतनाम २८,२२१, ब्राझील ३७,९९९, म्यानमार ४०,०००, इंडोनेशिया ५६,३००, चीन ७०,७०७, मलेशिया ७३,०९८, भारत १,२६,५१३, फिलिपिन्स ३,५६,३७१.