लंडन : जास्त वेळ काम करणाऱ्या लोकांना पक्षाघाताचा धोका अधिक असतो. पाच लाख लोकांच्या विश्लेषणातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पक्षाघातामागील कारणे स्पष्ट नसली तरी कामाचा ताण व चुकीच्या जीवनशैलीमुळे हे होत असावे, असे मानले जाते. आठवड्याला ३५-४० तासांऐवजी ४८ तासांपर्यंत काम करणाऱ्यांना पक्षाघात होण्याचा धोका दहा टक्के अधिक असतो, ५४ तास काम करणाऱ्यांचा हा धोका २७ टक्क्यांनी, तर ५५ तास काम करणाऱ्यांचा ३३ टक्क्यांनी वाढतो. त्यामुळे अधिक तास काम करणाऱ्या लोकांनी त्यांच्या रक्तदाबावर लक्ष ठेवायला हवे, असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या तज्ज्ञांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
‘त्यांना’ पक्षाघाताचा धोका अधिक
By admin | Published: August 20, 2015 11:09 PM