स्टॉकहोम- जगभरातील बहुतांश राजघराणी आता केवळ समारंभासाठी आणि केवळ दिखाऊ कार्यक्रमांपुरते उरले असले तरी त्यांच्याबाबत आजही लोकांमध्ये चर्चा होत असते. राजघराण्यांमधील विवाह, तंटे याबाबत आजही लोकांना उत्सुकता असते. स्वीडिश राजघराणेही युरोपिय नागरिकांचे लक्ष वेधून घेत असते. त्यातच आता राजचिन्हांच्या चोरीने भर घातली आहे.स्वीडिश राजघराण्याची राजचिन्हे व राजरत्ने चोरीला गेली आहेत. मंगळवारी दुपारी दोन चोरांनी स्टॉकहोममधील एका कॅथिड्रलमध्ये मांडलेल्या राजचिन्हांची चोरी केली. लोकांना पाहाता यावीत यासाठी ही चिन्हे व रत्ने काचेच्या पेटीमध्ये मांडण्यात आली होती. मात्र या चोरांनी ती मालेरन तलावात स्पीडबोटीतून पळवून नेली. हा तलावाचा प्रदेश 74 मैलांचा असून त्यामध्ये अनेक बेटे आहेत. तरिही चोरांनी धाडस करून थेट राजघराण्याच्या वस्तूंवर आणि दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
स्वीडनची राजरत्ने चोरुन, स्पीडबोटीने चोर फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 12:31 PM