लंडन : लंडनमधील सर्वांत सडपातळ इमारत म्हणून ओळखली जाणारी पाच मजली इमारत (थुरलो स्क्वेअर) १.३ मिलियन डॉलरला (९ कोटी ४६ लाख रुपये) विक्री झाली आहे. या इमारतीचा सर्वांत अरुंद भाग हा ५ फूट ६ इंच एवढा आहे. ही इमारत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उभारण्यात आली होती. या इमारतीत अजूनही काचेचे एक दुकान आहे. इस्टेट एजंट डेव्हिड माइर्स यांनी सांगितले की, ही इमारत लंडनच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे. या इमारतीच्या सर्वांत खालच्या भागात भोजनासाठीची जागा आहे. १६ फूट रुंद गार्डन फ्रेंच विंडोच्या मागे आहे. पहिला मजला सारख्याच आकाराचा आहे. येथे बेडरूम आणि स्टडी रूम आहे. दुसऱ्या मजल्यावर पायऱ्या आणि बाथरूम, शॉवर रूम आहे. तिसऱ्या मजल्यावर मास्टर बेडरूम आहे. याची अंतर्गत सजावटही खूपच आकर्षक आहे.
सर्वांत सडपातळ इमारतीची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 11:38 PM