यउंदे : बोको हरामच्या संशयित दहशतवाद्यांनी सोमवारी ३० बस प्रवाशांचे अपहरण केले. उत्तर नायजेरियाच्या सीमेला लागून असलेल्या कॅमेरूनच्या तौरोऊ गावातून हे अपहरण झाले, असे सूत्रांनी सांगितले. या ३० जणांचे काय झाले हे समजले नाही. बहुधा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असावा. कॅमेरूनचे ९ सैनिक अति उत्तरेकडील केरावा गावात बोको हरामच्या दहशतवाद्यांनी रविवारी केलेल्या हल्ल्यात जखमी झाले. याच भागात एक जानेवारी रोजी दहशतवाद्यांनी ११ बस प्रवाशांची हत्या केली होती.अफ्रिकेतील नायजेरिया या प्रचंड लोकसंख्येच्या देशात २००९ पासून बोको हरामच्या रूपाने फार मोठे संकट उभे ठाकले आहे. नायजेरियाच्या घटनेत इस्लामिक शरिया कायद्याचा अंतर्भाव करण्याचा बोको हरामचा प्रयत्न असून बहुसंख्य मुस्लिम असलेल्या उत्तर नायजेरियात इस्लामिक स्टेटची निर्मितीचाही त्यांचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)
बोको हरामकडून तीस बस प्रवाशांचे अपहरण
By admin | Published: February 10, 2015 10:50 PM