इस्रायल आणि हमास युद्धाला एक महिना उटून गेला आहे. इस्रायल हमासच्या ठिकाणांवर जबरदस्त हवाई आणि जमिनी हल्ले करत आहे. या युद्धात इस्रयल एका खास ड्रोनचा वापर करत आहे. खरे तर, हमासचे दहशतवादी ड्रोन्स अथवा छोट्या रॉकेट्सने हल्ला करून बोगद्यांमध्ये लपून बसतात. मात्र, असे बोगदे शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी इस्रायल ज्या ड्रोनचा वापर करत आहे, ते एक जबरदस्त गुप्तहेर आहे. एवढेच नाही, तर अचूक हल्ला करण्याचीही त्याची क्षमता आहे. मात्र प्रामुख्याने याचा वापर टेहळणीसाठी केला जातो.
या ड्रोनचे नाव आहे, एलबिट हर्मेस 450 (Elbit Hermes 450) ड्रोन. हे एक मेडियम साइज मल्टी पेलोड अनमॅन्ड एरिअल व्हेइकल आहे. हे केवळ दीर्घकालीन रणनीतिक मोहिमांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, हे ड्रोन एका वेळेला किमान 20 तास उडू शकते.
शत्रू पाताळात का असेने, शोधून काढतं ड्रोन -या ड्रोनमध्ये इलेक्ट्रोऑप्टिकल, इंफ्रारेड सेंसर्स लावण्यात आले आहे. ज्यांच्या सहाय्याने कम्यूनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स, सिंथेटिक अपर्चर रडार, ग्राउंड मूव्हिंग टार्गेट इंडीकेशन, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अथवा हाइपरस्पेक्ट्रल सेन्सर्सचा वापर केला जातो. हे एक असे तंत्रज्ञान आहे, ज्याच्या सहाय्याने, शत्रू पाताळात जरी लपलेला असला तरी शोधून काढता येतो.
1998 पासून होतोय वापर -इस्रायल 1998 पासून हर्मेस 450 ड्रोनचा वापर करतो. हे ड्रोन प्रामुख्याने इस्रायली हवाई दलाचा एक भाग आहे. हर्मेसचा वापर ब्राझल, जॉर्जिया, इस्रायल, इंग्लंड आणि अमेरिकेच्या एजन्सिजदेखील करतात. हे ड्रोन 20 फूट लांबीचे आहे. तसेच याचे वजन जवळापास 550 किलो एवढे आहे. महत्वाचे म्हणजे हे ड्रोन जास्तीत जास्त 180 किलो वजनाचे मिसाइल, रॉकेट अथवा बॉम्ब घेऊन उडू शकते. टेहळणीच्या दृष्टीने हे ड्रोन अत्यंत अचून मानले जाते.