पॅरिस - कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना फ्रान्समध्ये घडली आहे. हाय स्पीड ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना वीजेअभावी रात्रभर ट्रेनमध्येच अडकून राहावं लागल्याची घटना समोर आली आहे. ट्रेन पूर्णपणे बंद असल्याने अडकलेल्या प्रवाशांना पाणी, जेवन आणि ताज्या हवेअभावी रात्रभर राहावं लागलं आहे.
सकाळ वीज आल्यानंतर अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाने हाय स्पीड ट्रेनमधून बाहेर काढलं आहे. जवळपास 20 तास प्रवासी अडकून असल्याची माहिती मिळत आहे. ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला संताप, भावना व्यक्त केल्या आहेत. काहींनी जमिनीवर झोपलेल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. तर अनेकांनी सातत्याने 20 तासांपर्यंत मास्क लावून राहणं किती आव्हानात्मक असू शकतं असा सवाल उपस्थित केला.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार अनेक प्रवाशांना रात्री रेस्क्यू करण्यात आलं आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय रेल्वे प्राधिकरणाने एसएनसीएफने विजेच्या संबंधित या घटनेबाबत माफी मागितली आहे. विजेचा अडथळा रविवारी दुपारपासून सुरू झाला होता, ज्यामुळे फ्रान्सच्या पश्चिमभागात रेल्वे ठप्प झाली. या कारणाने या भागापासून ते पॅरिसपर्यंत प्रवासाला फटका सहन करावा लागला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भयंकर! लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने 7 मुलांनी केला 8 वर्षीय मुलीवर बलात्कार
ऐकावं ते नवलच! पतीच्या पासपोर्टवर 'ती' बॉयफ्रेंडला घेऊन गेली ऑस्ट्रेलियाला अन्...
"...तर 2024 ही भारतीय राजकारणातील अंतिम निवडणूक ठरेल"
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची प्रकृती ठणठणीत, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज