शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

रोहिंग्या छावण्यांमध्ये होणार हजारो बालकांचा जन्म, गरोदर महिलांमध्ये बलात्कार पीडितही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 2:13 PM

रोहिंग्यांच्या छावणीमध्ये दररोज 60 बालकांचा जन्म होत आहे.

ढाका- म्यानमारमधील त्रासाला कंटाळून बांगलादेशात आलेल्या रोहिंग्यांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. हजारो रोहिंग्या गर्भवती बांगलादेशातील आश्रय छावण्यांमध्ये प्रसूत होणार आहेत त्यातील बहुसंख्य महिलांवर गेल्या वर्षीच्या अत्याचारांच्या मालिकेत बलात्कार झाले आहेत. ऑगस्ट 2017 पासून 7 लाखांहून अधिक रोहिंग्यांनी म्यानमार सोडून बांगलादेशच्या दिशेने पलायन केले होते. यांमध्ये 81 हजार महिला गरोदर होत्या असे बांगलादेशाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून संयुक्त राष्ट्राच्यामते गरोदर महिला व मुलींची संख्या 40 हजारच्या आसपास असावी.

इस्लामिक रिलिफ कॅनडा या संस्थेच्या संचालक डॉ. फारिहा खान यांनी याबाबत सांगितले, "म्यानमारमध्ये गेल्या वर्षी रोहिंग्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्या. यामध्ये बहुतांश सर्व महिलांवर शारीरिक, मानसिक व लैंगिक अत्याचाराच्या खुणा आहेत. म्यानमारची सशस्त्र दले रोहिंग्या महिलांना एका रांगेत उभं करत आणि हव्या त्या महिलेवर बलात्कार करत अशा प्रकारे अत्यंत वाईट अत्याचार येथे महिलांवर झाले आहेत."रोहिंग्या छावणीमधील फातेमा नावाच्या 16 वर्षांच्या मुलीच्या नवऱ्याला या अत्याचारांमध्ये छार मारण्यात आले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आता ती गर्भवती असून, होणारे बाळ कोणाचे आहे हे सुद्धा तिला माहिती नाही. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल बोलताना ती म्हणते," ते जर माझ्या नवऱ्याचे मूल असेल तर ते त्याच्यासारखे दिसेल जर दुसऱ्या कोणाचे असेल तर ते त्या माणसासारखे दिसेल. पण ते माझे बाळ असल्यामुळे मी त्याच्यावर प्रेमच करेन."

संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये दररोज 60 बालकांचा जन्म होत आहे. या वर्षभरामध्ये 16 हजार बालकांचा जन्म झाला असून मे आणि जून अखेरपर्यंत आणखी 25 हजार बालकांचा जन्म होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :Rohingyaरोहिंग्याRapeबलात्कारBangladeshबांगलादेशMyanmarम्यानमार