संयुक्त राष्ट्र : दुसऱ्या महायुद्धात ८७ हजार जवानांची आहुती देणाऱ्या भारताने जगाला दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी ठोस आणि सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा या दुष्ट प्रवृत्तीमुळे दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयंकर रक्तपात होईल, असा इशाराही भारताने दिला आहे.अवघ्या मानवजातीसाठी दहशतवादापासून मोठा धोका आहे. दहशतवाद म्हणजे अशी जागतिक दुष्ट प्रवृती असून याचा जागतिक कारवाईनेच नि:पात होऊ शकतो. यासाठी प्रयत्न कमी पडू नयेत, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी भगवंत बिष्णोई यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत द्वितीय महायुद्धाच्या स्मृती या विषयावरील विशेष अधिवेशनात सांगितले.संयुक्त राष्ट्राचा भारत हा संस्थापक सदस्य असून या संस्थेचे तत्त्व आणि उद्दिष्टांप्रती भारत सदैव बांधील राहील, अशी ग्वाही बिष्णोई यांनी दिली. द्वितीय महायुद्धात भारताचे ८७ हजार जवान शहीद झाले होते,तर हजारो जवान जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)महायुद्धासारखा नरसंहार> दहशतवाद जगभर पसरला आहे. दुसऱ्या महायुद्धासारखा नरसंहार या दहशतवादामुळे होऊ शकतो. > दुसऱ्या महायुद्धानंतरच्या ७० वर्षांत प्रगती झालेली असली तरी युद्धाची शक्यता पुरती कमी झालेली नाही. १६ लाख लोकांचा बळी> युद्ध आणि सशस्त्र संघर्षाच्या घटना कमी होतील; परंतु लोकांवरील प्रभाव वाढला आहे. > १६ व्या शतकात सशस्त्र संघर्षात १६ लाख लोकांचा बळी गेला. ही संख्या २० व्या शतकात वाढून ११ कोटींवर गेली आहे, असा दाखलाही भगवंत बिष्णोई यांनी यावेळी दिला.
दहशतवादाने भयंकर रक्तपाताचा धोका
By admin | Published: May 07, 2015 1:19 AM