शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

वैमानिकाने दिला होता धोक्याचा संदेश?

By admin | Published: February 06, 2015 2:25 AM

तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत.

तैपेई : तैवानमध्ये घडलेल्या विमान अपघातात मरण पावलेल्यांची संख्या ३१ वर पोहोचली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारण अजूनही १२ जण बेपत्ता आहेत. ही दुर्घटना कशी घडली, याबाबत तैवानचे नागरी उड्डयन प्रशासन आणि ट्रान्सएशिया एअरवेजने काहीही ठोस सांगण्यास नकार दिला असला तरी वैमानिकाने विमान ९० अंशांनी कलंडण्याआधी विमान संकटात असल्याचा संदेश दिला होता (मे डे) असे नागरी उड्डयन प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले; परंतु त्यांनी दुर्घटनेमागील संभाव्य कारणांबाबत बोलणे टाळले.ट्रान्स एशियाचे विमान (जीई-२३५-एटीआर ७२-६००) उड्डाणानंतर १० मिनिटांनी हवेत हेलकावे घेत पुलावर धडकत नदीत (किलंग) कोसळले. या विमानात चालक पथक आणि ५८ प्रवासी होते. बेपत्ता सर्व प्रवासी चिनी पर्यटक आहेत. हे विमान किनमेनकडे जात होते. (वृत्तसंस्था)पुलावर धडकण्याआधी या विमानाचा एक पंखा पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला धडकला होता. हे विमान कोसळत असताना पुलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीवरील डॅशबोर्ड कॅमेऱ्याने हा अंतिम क्षण टिपला आहे.विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्याचे तैवानच्या नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले. तथापि, नदीतील दलदलीमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. अग्निशमन दलाचे पाणबुडे नदीच्या तळाशी जाऊन मृतदेह शोधत आहेत.३१ चिनी प्रवाशांचे नातेवाईक विशेष विमानाने तैवानला पोहोचत आहेत. १५ प्रवाशांना वाचविण्यात आले आहे. यात एका कुटुंबातील तिघांचा समावेश असून यात एका बालकाचाही समावेश आहे. एटीआर-७२-६०० हे विमान दर्जेदार कंपनीचे असून वैमानिकालाही ४,९०० तास उड्डाणाचा अनुभव होता, असे नागरी उड्डयन प्रशासनाने सांगितले.आवाज ऐकल्यानंतर आसने बदलली...हे विमान उड्डाण घेण्यापूर्वीच तैवानी दाम्पत्य आपल्या दोन वर्षांच्या बाळासह डाव्या बाजूकडील आसन बदलत उजव्या बाजूकडील आसनावर स्थानापन्न झाल्याने ते बचावले, असे वृत्त युनायटेड डेलीने दिले आहे. विमानाच्या पंख्यातून येणाऱ्या आवाजामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने आम्ही जागा बदलली, असे लिन यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे. नंतर विमान कलंडत नदीत कोसळले. लिनने जागा सोडत आपल्या पत्नीला ओढून वर काढले. आपले बाळ पाण्यात पडल्याचे लिनला दिसले. पाण्यात बुडाल्याने बाळाचा चेहरा आणि ओठ काळे-निळे पडले होते. प्रसंगावधान राखून बाळाच्या छातीवर दाब देऊन (सीपीआर तंत्र) बाळाच्या हृदयाची गती सुरू करण्यात लिन यशस्वी ठरला.हवाई प्रवास धोकादायक होत आहे का?.....गेल्या वर्षी एअर मलेशियाचे विमान भर आकाशातून गायब होणे आणि त्यानंतर एअर एशिया विमानाच्या भीषण दुर्घटनेमुळे हवाई प्रवास धोकादायक तर होत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे. विमान दुर्घटनेच्या दृष्टीने मागचे वर्ष अत्यंत दु:खदायी ठरले.गेल्या वर्षी २१ विमान दुर्घटना घडल्या. विमान दुर्घटनांची ही संख्या कमी आहे. पन्नास वर्षांपूर्वी आजच्या तुलनेत पाच टक्के विमानांची उड्डाणे होत होती; परंतु दुर्घटनेचे प्रमाण चौपट होते. एअरलाईन रेटिंग डॉट कॉमच्या माहितीनुसार मागच्या वर्षी जगभर विमानसेवा देणाऱ्या व्यावसायिक कंपन्यांच्या विमानांनी २ कोटी ७० लाख उड्डाणे केली. यातून ३.३ अब्ज प्रवाशांनी हवाई सफर केली. (वृत्तसंस्था)