वॉशिंग्टन : नासाच्या हबल दुर्बिणीने गुरू ग्रहावरील तीन चंद्रांचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केले आहे. एकाच वेळी तीन चंद्र दिसणे ही एक दुर्मिळ अशी खगोलीय घटना आहे. गुरू ग्रहाचे चंद्र युरोपा, कॅलिस्टो व लो यांचे हे छायाचित्र घेण्यात आले आहे. हे तीन चंद्र गुरूभोवती १७ दिवस फिरत होते. बहुतांश वेळी हे चंद्र वेगवेगळे गुरू ग्रहासमोरून जातात. त्यांची सावली गुरूच्या ढगावर पडते; पण क्वचितच ते एकाच वेळी आकाशात दिसतात. १० वर्षांत असे दृश्य एक किंवा दोनच वेळ दिसते. हबलने २४ जानेवारी रोजी हे छायाचित्र घेतले आहे. या दुर्बिणीचा वाईल्ड फिल्ड कॅमेरा ३ वरून नेहमीच्या प्रकाशात हे चित्र घेण्यात आले आहे. या चंद्रांचे रंग वेगवेगळे आहेत. कॅलिस्टोवर क्रेट असल्याने त्याचा रंग भुरा, तपकिरी दिसतो, युरोपावर बर्फाचा थर आहे, त्याचा रंग पिवळसर शुभ्र दिसतो. लो चंद्रावर जागृत ज्वालामुखी असल्याने त्याचा रंग केशरी, नारंगी दिसतो. (वृत्तसंस्था)
हबल दुर्बिणीने घेतले तीन चंद्रांचे छायाचित्र
By admin | Published: February 09, 2015 12:11 AM