बैरुत : अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जागतिक फौजांनी केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेटच्या कब्जातील सिरियातील ३ हंगामी तेल प्रकल्प नष्ट झाले. संघटनेच्या आर्थिक नाड्या आवळण्याच्या उद्देशातहत या तेल प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले.तुर्कीच्या सीमेलगतच्या ताल अबयाद भागानजीक जागतिक आघाडीच्या फौजांनी नेम साधून हवाई हल्ला केला, असे सिरियन आॅर्ब्झव्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच निरीक्षकांनी सांगितले. (वृत्तसंस्था)