लंडन : अण्वस्त्रांनी भरलेल्या पाणबुडीमध्ये कोकेन हा अंमली पदार्थ सेवन करताना ब्रिटिश रॉयल नेव्हीच्या नौसैनिकांनी पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या तिघांना अमेरिकेच्या फ्लोरिडा बंदरानजीक पकडण्यात आले. तिघांचीही चाचणी पाणबुडीवरील गोपनिय कारवाईवेळी करण्यात आली होती. या सैनिकांना तातडीने पाणबुडीवरून उतरवून पाणबुडी स्कॉटलंडच्या नौदल तळावर नेण्यात आली आहे.
लष्करी सुत्रांनी डेलीमेलली दिलेल्या माहितीनुसार एचएमएस वेनजेंस या पाणबुडीवर कोकेन सेवन करणाऱ्या नौसैनिकांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांना पकडता आले नाही. या नौसैनिकांनी कुणकूण लागल्याने रक्तातून कोकेनचे अंश बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी पिले. यामुळे टेस्टमधून वाचले.
या पानबुडीमध्ये 12 हजार किमीवर हल्ला करता येणारी मिसाईल बसविण्यात आली आहेत. नशेमध्ये असलेले नौसैनिक या पाणबुडीसाठी धोकादायक अशासाठी आहेत, कारण या पाणबुडीवर 16हून जास्त अण्वस्त्रे तैनात आहेत. याशिवाय 10 हजार किमीवर हल्ला करू शकणारी ट्रायडेंट मिसाईलही आहे, जी हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा आठ पटींनी संहारक आहे.
या मिसाईलची तीन वर्षांपूर्वी चाचणी घेण्य़ात आली होती. यावेळी तिचा वेग 21 हजार किमी प्रती तास नोंदविण्यात आला होता. जेव्हा ही मिसाईल डागण्यात आली होती तेव्हा तिच्या टप्प्यातील सर्व विमाने रद्द करण्यात आली होती.