शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

सिडनीत थरार!

By admin | Published: December 16, 2014 4:02 AM

एका सशस्त्र इराणी माथेफिरूने शहराच्या मध्यवस्तीतील लोकप्रिय कॅफेमध्ये ओलीस ठेवलेल्या सर्वांची पोलिसांनी मुक्तता केल्याने आॅस्ट्रेलियाचे हे सर्वात मोठे शहर अखेर १८ तासांनी भयमुक्त झाले.

सिडनी : एका सशस्त्र इराणी माथेफिरूने शहराच्या मध्यवस्तीतील लोकप्रिय कॅफेमध्ये ओलीस ठेवलेल्या सर्वांची पोलिसांनी मुक्तता केल्याने आॅस्ट्रेलियाचे हे सर्वात मोठे शहर अखेर १८ तासांनी भयमुक्त झाले. दुर्दैवाने या भयनाट्यात दोन ओलिसांचा मृत्यू झाला व काही पोलिसांसह अनेक जखमी झाले. दोघांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सुखरूपपणे सुटका झालेल्यांमध्ये विश्वकांत अंकीरेड्डी (३०, रा. गुंटूर, आंध्र प्रदेश) व पुष्पेंदू घोष या भारतीयांचाही समावेश आहे. अंकीरेड्डी हे इन्फोसिस या आयटी कंपनीचे अधिकारी आहेत. घोष यांच्याविषयीची इतर माहिती लगेच मिळाली नाही.ओलीसनाट्य संपले आहे. अधिक तपशील यथावकाश देऊ, असा संदेश न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी स्थानिक वेळेनुसार पहाटे २.४५ वाजता टिष्ट्वटरवर टाकल्यावर दिवसभर जीव मुठीत धरलेल्या शहराने सुटकेचा नि:श्वास टाकला. या ओलीस नाट्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारा माथेफिरू ५० वर्षांचा मन हरून मोनीस हा स्वत:ला इस्लामी धर्म प्रचारक म्हणविणारा इराणी निर्वासित आहे. कॅफेत घुसलेल्या सशस्त्र पोलिसांशी झालेल्या झटापटीत मोनीस मारला गेल्याचे वृत्त स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिले. अखेर सुटका झाली...हे ओलीसनाट्य सुरू होऊन पाच तास उलटल्यानंतर एका महिलेसह पाच ओलीस कॅफेमधून पळत पळत बाहेर आले. दोघे जण पुढच्या दरवाजाने बाहेर पडले, तर एकाने धुराड्यातून मार्ग काढला. तासाभराने आणखी दोन जण बाहेर पडले. त्यानंतर काही तासांनी ओलीस असलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.ओलीसनाट्याचा सूत्रधार असणारा मोनीस चाळिशीतील असून, त्याने काळे जाकीट घातले होते. अफगाणिस्तानात आॅस्ट्रेलियन सैनिक तैनात केल्याच्या निषेधार्थ या माथेफिरूने हे कृत्य केले असावे, असा एक अंदाज आहे.आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सर्वच खेळाडूंना कडक सुरक्षा पुरविली असून, बीसीसीआय परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. सिडनीतील हल्ला दुर्दैवी आणि अमानवी आहे. या कठीण समयी भारत आॅस्ट्रेलियाच्या सोबत होता आणि यापुढेही राहील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान इमारती केल्या रिकाम्या; रस्ते, रेल्वेही बंदमार्टिन प्लेसमधील लिंड्ट चॉकलेट कॅफेमध्ये हे नाट्य घडले. हे ठिकाण शहराच्या अत्यंत मध्यवस्तीतील आहे. येथून संसद, सिडने आॅपेरा हाऊस, स्टेट लायब्ररी, अमेरिकेची वकिलात व न्यायालये जवळ आहेत. या इमारती रिकाम्या करून घेण्यात आल्या होत्या. तसेच बाजूचे सर्व रस्ते व रेल्वेसेवाही बंद करण्यात आली होती.माथेफिरूच्या मागण्याआॅस्ट्रेलियाचे पंत्रधान टोनी अ‍ॅबट यांच्याशी बातचीत करू द्यावी. ‘इसिस’ या दहशतवादी इस्लामी संघटनेचा ध्वज आणून द्यावा.