बीजिंग : चीनने तिबेटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या विमानतळ टर्मिनलचा सोमवारी वापर सुरू केला. भारताच्या सीमेजवळ असलेल्या या टर्मिनलची २०२० साली वार्षिक क्षमता ७५०००० प्रवाशांना व तीन हजार टन माल वाहतूक हाताळण्याची असेल. हे नवे विमानतळ टर्मिनल तिबेटमधील सहावे असून, ते अरुणाचल प्रदेशच्या जवळ असलेल्या निंगची मैनलिंग विमानतळाचा भाग आहे.तिबेटमध्ये चीन रस्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवत असल्यामुळे भारतात त्याबद्दल चिंता व्यक्त झाली आहे. या पायाभूत सुविधांचा मोठा लाभ चीनच्या लष्कराला होत आहे. गेल्या काही वर्षांत भारतानेही सीमेवरील भागात विकासाची कामे हाती घेतली आहेत. विमानतळाने १०,३०० चौरस मीटर जागा व्यापली असल्याचे सोमवारी चीनची अधिकृत वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’ने म्हटले. (वृत्तसंस्था)
तिबेटमध्ये दुसरे हवाई टर्मिनल सुरू
By admin | Published: March 07, 2017 4:07 AM