टिकटॉक या चिनी अॅप्लिकेशनचे सीईओ केविन मेयर (Kevin Mayer) यांनी राजीनामा दिला असून आता अमेरिकेचा दबाव वाढू लागला आहे. चार महिन्यांपूर्वीच मेयर यांनी TikTok मध्ये जबाबदारी स्वीकारली होती.
गेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेमध्ये टिक टॉकवर बंदी आणण्यासाठी हालचाली सुरु आहेत. भारतात तर कधीच बंदी लादण्यात आली आहे. अमेरिकेची कंपनी मायक्रोसॉफ्ट टिकटॉक विकत घेणार होती. याबाबत बोलणीही सुरु होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कायदाच करत टिकटॉक एकतर अमेरिकेतील व्यवसाय विकेल किंवा अॅप बॅन केले जाईल असे आडकाठी आणली आहे.
केविन मेयर हे Disney मध्ये वरिष्ठ पदावर होते. त्यांनी चार महिन्यांपूर्वीच टिकटॉक जॉईन केले होते. राजीनामा देताना केविन मेयर यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यात राजकीय वातावरण खूप बदलले आहे. जे काही बदल करायचे होते ते मी केले आहेत. ज्याच्यासाठी मला जागतिक स्तरावर नेमले होते ती जबाबदारी मी पार पाडली आहे.
दुसरीकडे TikTok च्या प्रवक्त्याने यावर कंपनी केविन मेयर यांच्या निर्णयाचा सन्मान करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजकीय गोष्टी कमालीच्या बदलल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीला व्यवसाय विकण्यासाठी 90 दिवसांचा वेळ दिला आहे. यावर मायक्रोसॉफ्ट टिकटॉकची कंपनी बाईटडान्ससोबत चर्चा करत आहे. तर ओरॅकलनेही यामध्ये संधी साधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आता मेयर यांची जागा TikTok चे व्यवस्थापक व्हॅनेस्सा पप्पास घेणार आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांत राजपूत: "तीन महिन्यांपासून सुरु होते Black Magic"; रियाच्या घरी गोंधळ उडाला
Video: जग पुन्हा हादरले! रशियाने सर्वात शक्तीशाली, संहारक अणुबॉम्ब जगासमोर आणला
रेल्वेमध्ये भरती, मुलाखत...; 50 जणांकडून उकळले 1 कोटी
लडाखमध्ये परिस्थिती खूपच गंभीर; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची कबुली
बडे काम की चीज! LIC ने आणली नवी पॉलिसी; आयुष्यभर देणार उत्पन्न
शेवटी आयआयटीच ती! कारसाठी बनविली जबरदस्त बॅटरी; एका चार्जिंगमध्ये 1600 किमीची रेंज
CoronaVirus News चीनला भिडला! छोट्याशा देशाने कोरोनावर लस बनविली; साईड इफेक्ट शून्य
एकटीला पाहून साधुने बलात्काराचा प्रयत्न केला; मार्शल आर्ट मास्टर महिलेने धु धु धुतले