ऑनलाइन लोकमत
रेडवूड सिटी, दि. ५ - नवीन वर्षात प्रत्येकाने काही ना काही तरी संकल्प करण्याचे ठरविले असेलच. असाच संकल्प फेसबुक या संकेतस्थळाचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याने केला आहे. मार्क झुकरबर्गने गेल्या वर्षी पुस्तके वाचन करण्याचा संकल्प केला होता आणि तो ब-यापैकी यशस्वीही केला. यंदा त्याने धावण्याचा संकल्प केला आहे.
मार्क झुकरबर्गने फेसबुकवर ए ईयर ऑफ रनिंग असे एक अधिकृत पेज बनविले आहे. या पेजवर त्याने गेल्या महिन्यात भारतात आल्यावर दिल्लीतील इंडिया गेटच्या परिसरात आपल्या सहका-यांसोबत धावतानाचा फोटो अपलोड केला आहे. तसेच, २०१६ मध्ये ३६५ मैल धावण्याचे ठरविले असून फेसबुक युजर्सनीही या पेज लाईक करुन त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले अनुभव शेअर करावे असेही मार्क झुकबर्गने नमूद केले आहे. दरम्यान, या ए ईयर ऑफ रनिंग या पेजला या आठवड्यात ४२,००० पेक्षा जास्त जणांनी लाईक करुन सहभाग घेतल्याचे समजते. गेल्या वर्षी मार्क झुकरबर्गने अनेक पुस्तकांचे वाचन करण्याचा संकल्प केला होता.