लंडन : शंभर वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक जहाजात सापडलेल्या बिस्किटाला लिलावात १५ हजार पौंड किंमत मिळाली. आज जगातील हे सगळ्यात महागडे बिस्कीट ठरले आहे. हे जहाज बुडताना हे बिस्कीट जेम्स फेनविकने वाचविले होते. फेनविकने या जहाजातून बुडणाऱ्या काही प्रवाशांनाही वाचविले होते. हे बिस्कीट त्यांनी एका लिफाफ्यामध्ये सांभाळून ठेवले व त्यावर लिहिले होते की ‘एप्रिल २०१२ मध्ये टायटानिक जीवनरक्षक नावेत हे बिस्कीट सापडले होते.’ विल्टशायरमध्ये हेन्री एल्डिज अँड सन्स लिलाव समूहाने हा लिलाव केला होता. या लिलावामध्ये एका छायाचित्राला २१ हजार पौंड किंमत आली.
टायटॅनिक बिस्किटला मिळाले १५ हजार पौंड
By admin | Published: October 25, 2015 11:11 PM