हॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'टायटॅनिक' (Titanic)मध्ये त्या समुद्रात बुडालेल्या जहाजाची कथा जगासमोर आणली होती जे समुद्राच्या तळात दफन झालं होतं. जगातलं सर्वात मोठं जहाज असलेल्या टायटॅनिकवर १५०० लोकांचा मृत्यू झाला होता. यात जवळचं जहाज एसएस कॅलिफोर्नियाच्या टेलीग्राफ ऑपरेटरला व्हिलनसारखं दाखवण्यात आलं होतं. आता ११० वर्षानंतर या रहस्यावरून पडदा उठला आहे की, अखेर त्या रात्री काय झालं होतं.
Mirror च्या वृत्तानुसार, टायटॅनिकमध्ये जास्त लोकांच्या मृत्यूला एसएस कॅलिफोर्नियाच्या जवळच्या जहाजावरील टेलिग्राफ ऑपरेटर सिरिल इवांसला दोषी ठरवण्यात आलं होतं. कारण तो टायटॅनिकच्या इमरजन्सी कॉलवेळी झोपलेला होता. पण त्याला दोषी ठरवणं योग्य आहे का? एका इतिहासकाराचा दावा आहे की, काय टायटॅनिकच्या पीडितांना वाचवलं जाऊ शकलं असतं? तर या रहस्यावरून ११० वर्षांनंतर पडदा उठला आहे.
जेव्हा १९१२ मध्ये टायटॅनिक बुडत होतं तेव्हा जवळचं एकमेव जहाज एसएस कॅलिफोर्नियामध्ये वायरलेस ऑपरेटर इमरजन्सी कॉलवेळी झोपलेला होता. पण एका तज्ज्ञांचं मत आहे की, जहाजावर टेलिग्राफ ऑपरेट करणारा सिरिल इवांस बुडणाऱ्या लोकांना वाचवू शकला नसता.
सिरिलची या गोष्टीसाठी निंदा केली जाते की, टायटॅनिक हिमखंडासोबत टक्कर झाल्याच्या काही मिनिटांपूर्वी १४ एप्रिल १९१२ ला रात्री ११.३० वाजता तो झोपायला गेला होता. एका अमेरिकन चौकशीतून आढळून आलं की, जर सिरिल आपल्या ड्युटीवर आणखी काही वेळ राहिला असता तर त्याच्या जहाजाने प्रवाशांचा जीव वाचवला जाऊ शकला असता.
पण आता ही बाब समोर आली आहे की, सिरिल दर रात्री त्यावेळी झोपायला जात होता. तसेही एकटं स्टेशन चालवणाऱ्या टेलिग्राफ ऑपरेर्ससाठी रात्री ११ वाजता सामान्य साइन-ऑफचा वेळ राहत होता. टायटॅनिक दुर्घटनेआधी समुद्री टेलिग्राफ स्टेशन्सना २४ तास काम करण्याची काहीच गरज नव्हती.