शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
2
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
3
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
4
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
5
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
6
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
7
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
8
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
9
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
10
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

पहिल्यांदाच समोर आले टायटॅनिकचे असे फोटो, बघा समुद्रात पडून असलेल्या जहाजाचा अद्भुत नजारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 9:42 AM

Titanic New Photo : अटलांटिक ओशनच्या बुडाशी पडून असलेल्या या जहाजाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. साइंटिस्ट्सने हे फोटो जारी करून लोकांसमोर वेगळा दृष्टीकोन ठेवला.

(Image Credit: SOURCE ATLANTIC PRODUCTIONS/MAGELLAN)

Titanic New Photo : टायटॅनिक जहाज समुद्रात बुडाल्यानंतर त्याची खूप जास्त चर्चा झाली. आजही यावर बोललं, लिहिलं जातं. हे विशाल जहाज मोठ्या जल्लोषात रवाना करण्यात आलं होतं. लोकांमध्ये याबाबत फार उत्साह होता. पण नियतीला वेगळंच मंजूर होतं. हे जहाज ग्लेशिअरला धडकलं आणि महासागरात बुडालं. जहाजातील जास्तीत जास्त प्रवाशांचा थंड पाण्यात पडून मृत्यू झाला होता. जे काही वाचले त्यांना तो भयावह आठवतो. त्यानंतर अनेक एक्सपर्ट्स समुद्रात पडून असलेल्या या जहाजाचे फोटो आणि माहिती गोळा करत आलेत.

अटलांटिक ओशनच्या बुडाशी पडून असलेल्या या जहाजाचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. साइंटिस्ट्सने हे फोटो जारी करून लोकांसमोर वेगळा दृष्टीकोन ठेवला. पहिल्यांदाच टायटॅनिकच्या पूर्ण मलब्याचे फोटो समोर आले आहेत. असं पहिल्यांदाच झालं आहे की, टायटॅनिकच्या मलब्याला स्कॅन करण्यात आलं आहे. हे जहाज आजही समुद्रात 3800 मीटर खाली पडून आहे. अनेक एक्सपर्ट्सनी याच्या आत जाऊन किंवा कॅमेरा मशीनने याचे फोटो घेतले.

हे फोटो Magellan Ltd जारी केले. ही एक डीप सी मॅपिंग कंपनी आहे. याच्या मदतीसाठी अटलांटिक प्रोडक्शनही समोर आलं जे यावर माहितीपट बनवत आहे. दोघांनी मिळून 2022 मध्ये जहाजाच्या मलब्याची मॅपिंग सुरू केली होती. तशी तर मलब्याबाबत 1985 मध्येच चौकशी सुरू झाली होती. पण नेहमी जहाजाच्या एका भागाला स्कॅन केलं जात होतं. आता पहिल्यांचा पूर्ण मलबा स्कॅन करण्यात आला आहे.

या स्कॅनमध्ये रिमोट कंट्रोल कॅमेराचा वापर करण्यात आला होता. त्यांना साधारण 200 तास मलबा स्कॅन केला. यात दाखवण्यात आलं आहे की, जर समुद्रातील पाणी संपलं किंवा काढलं तर टायटॅनिक कसं दिसेल. या फोटोंच्या माध्यमातून 1972 साली बुडालेल्या या जहाजावर पुन्हा अभ्यास केला जाईल. साइंटिस्ट्सना पूर्ण विश्वास आहे की, यावेळी ते हे जहाज बुडण्याचं खरं कारण नक्की शोधू शकतील.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके