एक सुंदर महिला गुप्तहेरामुळे २ देश आमनेसामने आले आहेत. दोन्ही देश एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मुलीच्या सुंदरतेमुळे एका देशाला संशय आला त्यानंतर या संपूर्ण प्रकाराचा खुलासा झाला आहे. रशिया-यूक्रेन युद्ध अद्यापही सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये विविध स्तरावर एकमेकांना शह देण्याचा खेळ सुरू आहे.
रशियाने अलीकडेच दावा केला आहे की, यूक्रेन आणि ब्रिटीश एजेंट्सद्वारे गुप्तहेरांचा प्लॅन त्यांनी उघड केला आहे. शत्रू देश यूक्रेन व्लादिमीर पुतिन यांच्या एअर फोर्स पायलट्सला फसवून त्यांचे विमान यूक्रेनला घेऊन जाणार होते असा दावा रशियाने केला. परंतु या प्रकरणी लक्ष ठेवणाऱ्या पत्रकाराचा दावा आहे की, या प्रकारामुळे रशियाच्या गुप्तचर यंत्रणेला अपयशाचा सामना करावा लागला आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसनं म्हणणं आहे की, कीव मिलिट्री इंटेलिजेंस ऑफिसर्सने पैसे आणि युरोपीय संघाच्या देशातील नागरिकता देण्याच्या गॅरंटीवर रशियन मिलिट्री पायलट्सला भरती करण्याचा प्रयत्न केला. यूक्रेनी एजेंट्स आणि रशियन पायलट यांच्यात संवाद झाला. प्लॅननुसार, पायलटला यूक्रेनकडून एडवांस पेमेंट देण्यात आले होते. जेणेकरून Su-24, SU-34 या स्ट्रेजिक न्यूक्लिअर बॉम्बर Tu 22MZ घेऊन यूक्रेनकडे उड्डाण करू शकेल. तर पायलटच्या पत्नीसाठी रोमानिया आणि स्लोवेनियाहून पासपोर्टही तयार करण्यात आला होता.
पत्रकार क्रिस्ट्रो ग्रोजेव म्हणाले की, रशियाने इतका मोठा आरोप करून चूक केली. फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने स्वत:च्या आरोपाचा भांडाफोड केला. विमानाच्या आतील अनेक डिटेल्स यूक्रेनला पोहचवले. रशियन पायलट आणि यूक्रेनी एजेट्समध्ये चर्चा झाली. संवादावेळी फेडरल सिक्युरिटी हा कॉल रेकॉर्ड केला. यूक्रेन एजेंट्स त्याच पायलचशी संवाद साधत होते ज्याच्या पत्नीचा पासपोर्ट तयार झाला होता. परंतु पायलटनं संवादावेळी पत्नीऐवजी प्रेयसी मारियाला देशाबाहेर पाठवायचं आहे असं म्हटलं. यूक्रेननं ५ मिनिटांत पायलटच्या प्रेयसीची ओळख पटवली. ती खूप सुंदर होती. वास्तविक फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसची ती एक एजेंट होती. जेव्हा यूक्रेनच्या लोकांना रशियाचा प्लॅन समजला तेव्हा ते रशियाला चुकीची माहिती देऊ लागले. त्यांनी पायलटला चुकीचा मॅप आणि बनावट ऑपरेशनची माहिती पाठवली.