दुबई : दुबईमध्ये गेल्या काही तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात प्रचंड पाणी साचले आहे. दुबईमधील हा पाऊस सोमवारपर्यंत राहील, असा अंदाज वर्तिवण्यात येत आहे. दुबईमधील अनेक मॉलच्या परिसरात आणि काहीमॉलमध्येही पाणी भरले गेले आहे. त्यामुळे येथून बाहेर पडणे अवघड झाले आहे. एका मॉलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, पावसामुळे मॉल परिसरात पाणी साचले असून ग्राहकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओ आणि छायाचित्रातून असे दिसत आहे की, मुसळधार पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. सखल भागातील दुकानांमध्येही पाणी साचले आहे. या दुकानांमधील कर्मचारी वस्तू सुरिक्षत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यूएईत केलेल्या क्लाउड सिडिंगमुळे (कृत्रिम पाऊस) पावसाचे प्रमाण वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
दुबईत मुसळधार पाऊस; मॉलमध्येही शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 4:52 AM