कोरोनाच्या संकटामुळे आधीच अवघ्या जगाचे भविष्य आणि आयुष्य अंधकारमय झालेले असताना आता चीन, भारत, ब्रिटनसारख्या देशांवर वीज आणि इंधनाचे संकट ओढवले आहे. चीनमध्ये अनेक कंपन्यांना टाळे लावावे लागले असताना भारतावरहीवीज निर्मिची ठप्प होण्याचे (Power Outage) संकट घोंघावत आहे. दिल्लीला दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक असल्याने सगळीकडे अंधार पसरण्याची शक्यता आहे. अशातच आज एक देश पूर्ण अंधारात बुडाला आहे.
चीन आणि भारतामध्ये विजेची टंचाई समोर येत होती. परंतू पश्चिम आशियाई देश लेबनॉनमध्ये (Lebanon) विजेचे संकट कोसळले आहे. लेबनॉनने इंधन पुरवठा होत नसल्याने टंचाई झाल्याने अनेक भागात पुढील काही दिवसांसाठी वीज कापण्याची घोषणा केली आहे. लेबननच्या दोन सर्वात मोठ्या विद्युत निर्मिती प्रकल्पांचे काम ठप्प झाले आहे. यामुळे संपूर्ण लेबनॉन अंधारात बुडाला आहे.
स्काय न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार अल जहरानी आणि दीर अम्मार या विद्युत निर्मिती केंद्रांवर वीज निर्मिती 200 मेगावॉटपेक्षा खाली आली आहे. इंधन नसल्याने लेननॉनने अनेक कंपन्या बंद करायला लावल्या आहेत. यामुळे अन्न-धान्याचे साहित्याची देखील टंचाई भासू लागली आहे. लोक काळाबाजार करू लागले असून नागरिकांना चढ्या दराने साहित्य खरेदीसाठी मजबूर व्हावे लागत आहे. पेट्रोल पंपांवर देखील गाड्यांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
काही आठवड्यांपूर्वी ब्रिटनमध्ये अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर चीनमध्ये कोळशाची टंचाई झाल्याने अॅपल, टेस्लासारख्या कंपन्यांना उत्पादन थांबवावे लागले होते. आता भारतावर हे संकट घोंघावत असताना चौथ्या देशात ब्लॅकआऊट झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे अफवांचा बाजार गरम झाला आहे.