परदेशात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय श्रीमंत मुलाचं शीर हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या तावडीत सापडलं. तरूणाचं शीर धडापासून वेगळं झालं आणि त्याचा मृत्यू झाला. सांगितलं जात आहे की, मुलगा त्याच हेलिकॉप्टरमध्ये होता आणि तो हेलिकॉप्टरचे पंखे बंद होण्याआधीच सेल्फी घेण्यासाठी खाली उतरला होता.
जॅक फेंटन नावाचा तरूण ब्रिटनच्या एका सधन कुटुंबातील होता. तो त्याच्या तीन मित्रांसोबत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून Mykonos हून ग्रीसची राजधानी एथेंसजवळ एका प्रायव्हेट हेलिपॅडवर पोहोचला होता. इथे तो हेलिकॉप्टरचं इंजिन बंद होण्याआधीच खाली उतरला होता. तो हेलिकॉप्टरच्या मागे गेला जिथे त्याच्यासोबत हा अपघात झाला.
घटनेनंतर लगेच इमरजन्सी सर्व्हिसला बोलवण्यात आलं. पण पंख्याच्या वेगामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आता अपघाताच्या कारणांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणी पायलटवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकतो. जर त्याने इंजिन बंद होण्याआधीच प्रवाशांना उतरण्यास सांगितलं असेल.
एथेंस बेस्ड ओपन टीव्हीला सांगितलं की, असं होऊ शकतं की, अपघातावेळी जॅक फोनवर बोलत असेल किंवा सेल्फी घेत असेल. जॅकचे पालक दुसऱ्या हेलिकॉप्टरने Mykonos ला पोहोणार होते. हे सगळे सुट्टी एन्जॉय करून ब्रिटनला जाणार होते.
दरम्यान, जॅकचे वडील मिगुएल, The Hop Farm चे मार्केटिंग, सेल्स आणि पीआर हेड आहेत. हे फार्म 400 एकरमध्ये पसरलं आहे आणि फार फेमस आहे. जॅकच्या मृत्यूनंतर यावर फोकस केला जाईल की, तो हेलिकॉप्टरमधून का उतरला?