लाहोर : पाकिस्तानात १६०० संशयित दहशतवाद्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी त्यांच्या पायावर ‘ट्रॅकिंग चिप’ बांधण्यात येणार आहेत. हे संशयित ठराविक क्षेत्र सोडून अन्यत्र न जाण्याच्या कायद्यादेशीर बंधनाचे पालन करीत नाहीत, असे निदर्शनास आल्यानंतर हा उपाय करण्याचे घाटले असून अशी कारवाई त्या देशात प्रथमच होत आहे.पंजाब प्रांताच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ‘देशाच्या इतिहासात प्रथमच १६०० संशयित दहशतवाद्यांच्या घोट्यावर ट्रॅकिंग उपकरण बसवून पोलीस त्यांची इलेक्ट्रॉनिक निगराणी सुरू करणार आहेत. ट्रॅकिंग उपकरणांमुळे संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेता येणार आहे. ही उपकरणे ‘अँकल बॅण्ड’ म्हणून ओळखली जातात.
संशयित अतिरेक्यांच्या पायात ‘ट्रॅकिंग चिप’ची बेडी
By admin | Published: July 11, 2015 11:54 PM