लंडन - एका व्यक्तीच्या कारला एका दिवसांत नियम मोडल्या प्रकरणी तब्बल ५१ दंडाच्या नोटिसा मिळाल्या. यामधून त्याच्यावर एकूण सहा लाखांपेक्षा अधिक दंड ठोठावण्यात आला. रेजिडेंट रोडवरून कार ड्राईव्ह केल्याने या व्यक्तीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र आपल्याला ठोठावलेला दंड चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आला असून, आपल्याकडे टेस्ला कारचा त्या मार्गाने चालवण्याचा परवाना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेजिडेंट रोडवरून कार चालवण्याची परवानगी नव्हती. त्या रोडवरून केवळ माणसांना चालण्याची परवानगी दिलेली आहे. ब्रिटनमधील लंडन येथील रहिवासी जॉन बेरेट यांच्या कारला याच रेजिडेंट रोडवरून गेल्याने दंड ठोठावण्यात आला आहे. तोसुद्धा ५१ वेळा. सर्व पावत्यांवरील एकूण दंडाची रक्कम मिळून सहा लाखांपेक्षा अधिक आहे.
जॉन बेरेट हे पेशाने बिल्डर आहेत. त्यांनी सांगितले की, सर्व दंड हा पाच महिन्यांदरम्यान नोंदवला गेलेला आहे. मात्र या महिन्याच्या सुरुवातीलाच एकत्र त्यांच्याकडे पाठवण्यात आला. पत्नी लिसा हिने त्यांना जेव्हा घरी ५१ दंडाच्या नोटिसा आल्या म्हणून सांगितले तेव्हा त्यांना धक्का बसला. प्रत्येक वेळच्या दंडाची रक्कम ही १३ हजार रुपयांपेक्षा अधिक होती.
दरम्यान, बेरेट यांनी दावा केला त्यांच्याजवळ परवाना आहे. तो त्यांना त्यांची टेस्ला कार कुठल्याही दंडाशिवाय रेजि़डेंट रोडवरून चालवण्याची परवानगी देतो. त्यांनी सांगितले की, त्यांच्यावर जी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ती चुकीची आहे. त्यांना कुठलीही सूचना किंवा इशारा देण्यात आला नाही. थेट दंडाची पावती घरी पाठवण्यात आली.
जो जुर्माना लगाया गया है वो गलत है. उन्होंने आगे कहा- 'यह हास्यास्पद है, कोई चेतावनी या सूचना नहीं दी गई, सीधे चालान घर भेज दिया गया. तसेच कार कुठल्या कॅमेऱ्यामध्ये दिसली हेही पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले नाही, असे त्यांनी सांगितले.