नवी दिल्ली - प्रशांत महासागरात आसेल्या चक्रीवादळात फिलिपाईन्सजवळ एका व्यपारी जहाजाला जलसमाधी मिळाली आहे. यामध्ये 26 भारतीय खलाशी होते. त्यामधील 15 जणांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र अद्याप 11 भारतीय बेपत्ता आहेत. या बुडालेल्या जहाजावरील लोकांच्या बचाव आणि शोधकार्यासाठी दोन गस्ती बोटी तसेच तीन विमाने पाठवण्यात आल्याचे जपानी तटरक्षक दलाने सांगितले. मात्र, महासागरात जोराचे वादळ सुरु असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. जपानच्या तटरक्षक दलानी ही माहिती दिली आहे.
या जहाजावरील नागरिकांच्या मदतीसाठी जपान, फिलिपाईन्स आणि चीनकडून प्रयत्न केले जात असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
इमरॅल्ड स्टार या व्यापारी जहाजावरील क्रु मेंबर्सने जहाज बुडत असल्याचा संदेश दिल्याचे जपानी तटरक्षक दलाने सांगितले. हाँगकाँगमध्ये नोंदणी झालेले हे जहाज लिपाईन्सच्या ईशान्येकडे 280 किलोमीटर अंतरावरून प्रवास करीत होते. या जहाजावर 26 भारतीय खलाशी होते. यांपैकी 15 जणांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आले आहे. मात्र, अद्यापही 11 जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.