अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी गेल्या आठवड्यात व्हाइट हाऊसमध्ये (White House) प्राइड मंथच्या पार्श्वभूमीवर एक समारोह आयोजित केला होता. हा समारोह शनिवार (10 जून) आयोजित करण्यात आला होता. या समारोहादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोज मोंटोया नावाची एक ट्रान्सजेंडर कार्यकर्ती टॉपलेस झाल्याचे दिसत आहे.
रोज मोंटोयाचा टॉपलेस व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आता तिला कुठल्याही कार्यक्रमात बोलावले जाणार नाही, असा निर्णय व्हाइट हाऊसने घेतला आहे. महत्वाचे म्हणजे, ज्यावेळी रोज मोंटोया टॉपलेस झाली, तेव्हा राष्ट्रपती बायडेन तेथेच होते, असे बोलले जात आहे. राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी LGBTQ समाजा प्रति अमेरिकन सरकारचे समर्थन पाहण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यासंदर्भात बोलताना व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव काराइन जीन-पियरे मंगलवारी म्हणाले, रोजचे कृत्य कदापीही स्वीकारार्ह नाही. तिने शेकडो लोकांसमोह हे कृत्य केले आहे. महत्वाचे म्हणजे, या कार्यक्रमासाठी अनेक लोक आपल्या कुटुंबासोबत आले होते. तसेच भविष्यात अशा लोकांना निश्चितपणे आमंत्रित केले जाणार नाही, असेही जीन पियरे यांनी म्हटले आहे.