बाओबाब नावाचं एक फळ आहे, जे आपल्याला माहीत नाही. बाहेरून हिरवं आणि आतून कोरड्या नारळासारखं दिसतं हे फळ. ते चवीला काहीसं कडवट, आंबट असतं. ते सुकवून त्याची भुकटी तयार केली जाते आणि त्याचं तेलही तयार करण्यात येतं. ते फळ भारतात कुठंच मिळत नाही आणि त्याची झाडंही भारतात कुठंच नाहीत.ती झाडं आहेत आफ्रिकन देशांमध्ये आणि आॅस्ट्रेलियामध्ये. या झाडांचं आयुष्यमान प्रचंड आहे. दक्षिण आफ्रिकेत आणि झिंबाब्वेमध्ये सहा हजार वर्षांपासून बाओबाबची झाडं उभी आहेत. बाओबाबच्या ९ प्रजाती आहेत. आॅस्ट्रेलियातील एक तर झाड तीन हजार वर्षं जुनं आहे. प्रचंड आयुष्यमान असलेलं झाड (द ट्री आॅफ लाइफ) असंच बाओबाचं वर्णन केलं जातं. दक्षिण आफ्रिकेतील एका अशाच ६000 वर्षं जुन्या झाडाच्या आत चक्क पब आहे. आतमध्ये एका वेळेस १५ जण बसू शकतात आणि बीअरचा आनंद घेऊ शकतात. त्या १५ मध्ये आपला क्रमांक लागावा आणि आपल्यालाही आत जाता यावं, यासाठी हजारो पर्यटक प्रयत्न करतात. अर्थात आतमध्ये एकदा ६0 लोकांची पार्टीही झाली होती. मात्र झाडाचं अस्तित्व कायम राखण्यासाठी आता केवळ १५ जण असा नियम केला आहे. हा पबही खूप जुना म्हणजे १९३३ पासून त्या झाडाच्या आत आहे. त्या पबचं सीलिंग १३ फूट उंच आहे आणि आत बसायला लाकडी बाकं आहेत. मुळात या झाडाचं उंची आहे २२ मीटर आणि रुंदी आहे तब्बल ४७ मीटर. त्या ठिकाणाला भेट देणाºया प्रत्येकाला झाडाच्या आतील पबमध्ये जाण्याची संधी मिळत नाही. पण बाहेरही टेबलं मांडलेली असतात आणि तिथंही लोक पितात, खातात. जोहान्सबर्गहून काही तासांवर असलेल्या मोदादीस्क्लूफ या ठिकाणी हा अवाढव्य वृक्ष आहे. शेकडो वा काही हजार वर्षांपूर्वी त्याच्या फांद्यातून आणखी एक वृक्ष शेजारी उभा राहिला. तोही त्याचाच भाग आहे आणि एका भागातून जाऊ न दुसºया बाजूने येता यावं, असा छोटा रस्ताही आतमध्ये तयार करण्यात आला आहे. पण जे काही केलं आहे, ते त्या वृक्षाच्या खोडापासूनच. कधी जोहान्सबर्गला जाण्याची संधी मिळाली, तर हा वृक्ष पाहायला हमखास जावं.
6000 हजार वर्षांपासून उभा आहे हा वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:50 AM