अमेरिकेच्या उटाहमधून एक व्हिडीओ प्रचंड व्हाय़रल होत आहे. असा व्हिडीओ आजवर कोणीही टिपलेला नसेल. एकाचवेळी दोन हेलिकॉप्टर कोसळतानाचा हा व्हिडीओ आहे. बर्फाळ प्रदेशात जिथे लोक स्कीचा आनंद घेत होते, तिथेच हा अपघात झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
उटाह स्की स्लोप य़ेथे लोक स्किईंग करत होते. याचवेळी एक बर्फाचे वादळ उठले आणि तिथे हवेत असलेली दोन हेलिकॉप्टर क्रॅश होऊन बर्फाच्छादीत जमिनीवर कोसळली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
हा अपघात सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला आहे. यावेळी दोन्ही हेलिकॉप्टर खाली उतरत होती. तेव्हाच तिथे नॅशनल गार्डची ट्रेनिंग एक्सरसाईज सुरु होती. या अपघातामध्ये त्यांच्या जिवाला धोका होता. मात्र, पायलटने प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, हेलिकॉप्टर उडविणारे पायलट देखील प्रशिक्षण घेत होते. त्यांना बर्फाच हेलिकॉप्टर उतरवायचे होते. मात्र, हेलिकॉप्टरच्या पंख्य़ांमुळे अचानक निर्माण झालेल्या वादळामुळे तेथील बर्फ बाजुला झाला आणि हवेत उडाला. यामुळे काहीच न दिसल्याने चुकीच्या पद्धतीने क्रॅश लँडिंग झाले. एक हेलिकॉप्टर तर पलटी झाले. या दुर्घटनेत कोणाला दुखापत झाली नाही.