शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

गिचमिड स्वाक्षरी असलेले ट्रम्प...

By admin | Published: January 23, 2017 1:01 AM

अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शुक्रवारी पदग्रहण केल्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी दस्तावेजावर पहिली स्वाक्षरी केली

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शुक्रवारी पदग्रहण केल्यानंतर लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी दस्तावेजावर पहिली स्वाक्षरी केली आणि अत्यंत गिचमिड अक्षरांतील त्यांची स्वाक्षरी हा समाजमाध्यमांमध्ये लगेच चर्चेचा विषय झाला. स्वाक्षरी कशीही असली तरी ती करणारी व्यक्ती जगातील सर्वांत शक्तिशाली पदावर असल्याने तिच्यावर चर्चा होणे स्वाभाविकही होते.आधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लागू केलेली परवडणारी आरोग्य विमा योजना टप्प्याटप्प्याने मोडीत काढून तिच्या जागी अधिक लाभदायी योजना आणण्याचे काम प्रशासनाने सुरू करावे, असा ट्रम्प यांनी काढलेला फतवा हे त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून केलेले पहिले सरकारी काम होते. त्या फतव्यावरील ट्रम्प यांची स्वाक्षरी ही सरकारी दफ्तरातील त्यांची पहिली स्वाक्षरी होती. त्या स्वाक्षरीची (या बातमीसोबत दिलेली) छबी अल्पावधीत समाजमाध्यमांमध्ये पसरली.अमेरिकेतील ‘पोलिटिको’ या राजकीय नियतकालिकाने तर एका हस्ताक्षर तज्ज्ञाला कामाला लावून ट्रम्प यांच्या या स्वाक्षरीवरून त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याचे विश्लेषणही केले. या तज्ज्ञाच्या मते, ट्रम्प यांचे गिचमिड हस्ताक्षर हे त्यांच्या चंचल स्वभावाचे, रागाचे व भीतीचे द्योतक आहे. असे हस्ताक्षर असलेल्या व्यक्तीकडे दयाबुद्धीचा अभाव असतो व अशी व्यक्ती सत्ता, प्रतिष्ठा आणि आत्मस्तुतीला आसुसलेली असते, असेही या तज्ज्ञाचे मत पडले. मात्र या स्वाक्षरीच्या शेवटी ठळकपणे व स्पष्टपणे काढलेले ‘पी’ हे अक्षर या सर्व अवगुणांची भरपाई करणारे वाटते, असेही या नियतकालिकाने म्हटले.३० दशलक्षांनी बघितला शपथविधी-डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शुक्रवारी झालेल्या सूत्रे स्वीकारण्याच्या समारंभाला ३०.६ दशलक्ष लोकांनी बघितले. आठ वर्षांपूर्वी बराक ओबामा यांनी पहिल्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी यापेक्षा जास्त लोकांनी तो समारंभ बघितला होता, असे निल्सनने म्हटले.ट्रम्प यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर १६ मिनिटे आणि १२ सेकंद केलेल्या भाषणात राजकीय व्यवस्थेला दोष देऊन देशासाठी नवी दृष्टी देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भाषणात पायाभूत सुविधा, गुन्हेगारी व दहशतवाद या विषयांवर भर होता. ट्रम्प यांच्या निषेधार्थ मोठी निदर्शनेमहिला, मुस्लिमस, वेगवेगळ््या हक्कांचे गट, मेक्सिकन स्थलांतरीत, शारीरिकदृष्ट्या दुर्बल आणि पर्यावरणवाद्यांबद्दल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली शेरेबाजी व त्यांच्याबद्दलच्या धोरणांच्या निषेधार्थ शेकडो, हजारो संख्येतील महिलांनी शनिवारी अमेरिकेतील महत्वाच्या शहरांत आल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची मुले, पती, मित्रही होते. शुक्रवारीच ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड म्हणता येतील अशी निदर्शने झाली आहेत. या निदर्शकांना पाठिंबा म्हणून जगभर सहानुभूती फेऱ्याही काढण्यात आल्या. त्यात ५ दशलक्ष लोक सहभागी झाले होते.