ऑनलाइन लोकमत
स्टॉकहोम, दि. 7 - स्वीडनच्या राजधानीत भरधाव ट्रक रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडत दुकानामध्ये घुसवल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. स्वीडनमधील भारतीय दूतावासापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही घटना घडली असून, त्यानंतर गोळीबाराचा आवाजही ऐकू आला आहे. दरम्यान दुतावासात काम करणारे सर्व भारतीय आणि स्थानिक कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती भारतीय दुतावासाकडून देण्यात आले आहे. स्वीडनच्या पंतप्रधानांनी या घटनेमागे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली असून, या संदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
स्वीडनमधील एका सायंदैनिकाने या घटनेचे छायाचित्र प्रसारित केले आहे. या छायाचित्रात ट्रक स्टोअरमध्ये घुसल्याचे दिसत आहे. तसेच स्वीडिश रेडिओकडूनही या घटनेला दुजोरा देण्यात आला असून, या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे. तर एसव्हीटी या वाहिनीने गोळीबाराचा आवाजही एेकू आल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्वीडिश राजधानीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
ANI Exclusive: Visuals of the Stockholm attack from Drottninggatan street (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/tu4koGRL4m— ANI (@ANI_news) April 7, 2017
स्वीडनमधील भारताच्या राजदूत मोनिका मोहता यांनी आपण रस्त्यावर दोन जणांचे मृतदेह पाहिले असून, काही जोरदार आवाज ऐकल्याचे एएनआयला सांगितले. स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफेन यांनी दहशतवादी हल्ल्याची शंका व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांना परिसर खाली केला असून, दहशतवादी हल्ल्याची शक्यता गृहित धरून तपास सुरू केला आहे. तसेच स्टॉकहोममधील ट्रेन आणि मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे.
#UPDATE Swedish media say 3 killed as a truck crashes into Stockholm store, shots also fired.Attack happened 100 metres from Indian Embassy pic.twitter.com/QVNRgyKAF8— ANI (@ANI_news) April 7, 2017
As per embassy sources in Stockholm all embassy local and Indian staff are reported to be safe— ANI (@ANI_news) April 7, 2017