गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं हातपाय पसरलेले असून, संपूर्ण जग जागतिक साथीच्या कोरोना विषाणूशी झुंज देत आहे. दुसरीकडे अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कोरोना चाचणीसंदर्भातील मार्गदर्शक सूचना बदलल्या आहेत. प्रशासनाने हे दुस-यांदा असं केलं आहे. आता कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क साधणा-यांचीही चाचणी करणे अनिवार्य असेल, अर्थातच त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी त्यांना चाचणी करावी लागेल. ज्यांना लक्षणे नसतात, त्यांनी चाचणी करण्याची आवश्यकता नाही, असे सांगून सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी) ऑगस्टच्या उत्तरार्धात राज्य आरोग्य अधिकारी व तज्ज्ञांना नाराज केले होते. 24 ऑगस्टपूर्वी व्हायरसची लक्षणे असलेल्या सर्वांसाठी सीडीसीने चाचणी घेणे अनिवार्य केले आहे. त्याचबरोबर शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सीडीसीच्या चाचणीसंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांकडे पाठ फिरविण्यात आली आहे. अमेरिकेतील बर्याच राज्यांनी सीडीसीने संसर्ग रोखण्यासाठी 24 ऑगस्टच्या मार्गदर्शक सूचना नाकारल्या आहेत. रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन प्रकरणे कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इटली आणि स्पेनला कोरोनानं विळख्यात घेतल्याचं चित्र होतं, अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. अमेरिकेत कोरोनाने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 6,874,596 वर पोचली आहे, तर 202,213 पेक्षा जास्त लोक ज्यांनी आपले प्राण गमावले आहेत. भारत, ब्राझील, रशिया आणि पेरू यासारख्या देशांमध्येही मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.
आता लक्षणे नसलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार, ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 9:13 AM