शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

ट्रम्प आणि हिलरी यांची प्रतिस्पर्ध्यांवर किरकोळ आघाडी

By admin | Published: February 01, 2016 2:05 AM

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्राथमिक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्राथमिक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. अध्यक्षीय निवडणुकीत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ओयोवा या प्रांतात आपापल्या पक्षाच्या उमेदवारीचा दावा करणारे डेमोक्रॅटस्च्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्ध्यांवर किरकोळ आघाडी घेतल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे.महत्त्वाच्या अशा ओयोवा कॉकसपूर्वी, ब्लूमबर्गच्या सहकार्याने डेस मोईनेज रजिस्टरतर्फे जारी अंतिम जनमत सर्वेक्षणचे निष्कर्ष हिलरी आणि ट्रम्प यांच्याबाबत वेगवेगळी चित्र दाखवितात. नवीन सर्वेक्षणात ट्रम्प यांनी सिनेटर टेड क्रूझ यांच्यावर आघाडी घेतली असून, सिनेटर बर्नी सँडर्स यांच्यावर हिलरी यांनी किरकोळ आघाडी घेतली आहे.डेस माइनेस रजिस्टरने म्हटले आहे की, २०१६ मध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी ओयोवात पुन्हा आघाडी घेतली आहे. २८ टक्के लोकांनी ट्रम्प यांना, तर २३ टक्के लोकांनी क्रूझ यांना पाठिंबा दिला. यापूर्वी १३ जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात २५ टक्के लोकांनी क्रूझ यांना, तर २२ टक्के लोकांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता.दुसरीकडे सँडर्स यांच्यावर हिलरी यांनी किरकोळ आघाडी घेतली आहे. कॉकसच्या सर्वेक्षणात ४५ टक्के लोकांनी हिलरी यांना, तर ४२ टक्के लोकांनी सँडर्स यांना पसंती दाखविली आहे. यावर भाष्य करताना राजकीय निरीक्षक डेव्हिड अ‍ॅक्सेलारोड म्हणाले की, डेमोक्रॅटिक पक्षातील स्पर्धा तीव्र दिसते. गेल्या काही महिन्यांत स्पर्धा वाढल्यास सँडर्स हिलरी यांच्या बरोबर येऊ शकतात. दरम्यान, ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने डेमोक्रॅटस्तर्फे हिलरी यांना, तर रिपब्लिकनतर्फे जॉन कसीच यांना अनुमोदन दिले आहे. (वृत्तसंस्था)