मियामी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कधीकाळी मालकीची असलेली दहा वर्षे जुनी चमकदार लाल रंगाची फेरारी कार मागच्या आठवड्यात लिलावामध्ये २,७०,००० डॉलर्सना विकली गेली. ही माहिती लिलालकर्त्यांनी दिली. अशाच प्रकारची कार परंतु तिचा मालक प्रसिद्ध व्यक्ती नसेल, तर सामान्यत: तिची किंमत १,२५,००० ते १,७५,००० डॉलर्सदरम्यान असते. अर्थात, ही किंमत तिची अवस्था, मायलेज आणि आॅप्शनल इक्विपमेंटवर अवलंबून असते, असे आॅक्शन्स अमेरिकाच्या प्रवक्त्या अॅमी खिस्ती यांनी सांगितले. ट्रम्प यांची फेरारी कोणी विकत घेतली त्याचे नाव त्यांनी सांगितले नाही. मियामीच्या उत्तरेला ३० मैलांवर (५० किलोमीटर) फोर्ट लॉडरडेल येथे झालेल्या परिषद केंद्रात कारचे चाहते व ट्रम्प यांचे पाठीराखे २००७ च्या एफ ४३० कारसाठी उपस्थित होते. २००४ मध्ये अमेरिकेत ही फेरारी १,८६,९२५ ते २,१७,३१८ डॉलरमध्ये विकली गेली होती.
ट्रम्पच्या फेरारीने लिलावात मिळवले २,७०,००० डॉलर्स
By admin | Published: April 06, 2017 4:34 AM