वॉशिग्टन, दि. 18- स्पेनमधील बार्सिलोना शहराला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं. दहशतवाद्यांनी लास रॅमब्लास या गर्दीच्या रस्त्यावर भरधाव वाहनानं अनेकांना चिरडल्यानंतर अंदाधुंद गोळीबारही केला आहे. या हल्ल्याचा सगळीकडूनच निषेध केला जातो आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. तसंच स्पेनसाठी मदतीचा हात ट्रम्प यांनी पुढे केला आहे.
'बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमेरिका निषेध करते आहे. आमच्याकडून आवश्यक ती मदत केली जाईल', असं ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.
'सगळ्यांनी कठोर आणि मजबूत व्हा, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो', असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
राज्य सचिव रेक्स टिलरसन म्हणाले, शहरातील अमेरीकन नागरीकांना परराष्ट्रातील वकिलांमार्फत सहाय्य केलं जाईल तसंच प्रत्येकाने आपापल्या कुटुंबियांसोबतच रहावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसंच या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांचं त्यांनी सांत्वनही केलं आहे.
आणखी वाचा
स्पेनच्या कॅम्ब्रिल्समध्येही हल्ल्याचा प्रयत्न, पाच दहशतवादी ठार
स्पेनमध्ये दहशतवादी हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, इसिसनं स्वीकारली जबाबदारी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. तर दहशतवादाविरोधात आम्ही स्पेनसोबत असल्याचं विधान इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेसा मे यांनी केलं आहे.
स्पेनच्या कॅम्ब्रिल्समध्येही हल्ल्याचा प्रयत्न, पाच दहशतवादी ठारस्पेनच्या बार्सिलोना शहरातील रॅमब्लास येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कॅम्ब्रिल्स येथेही व्हॅन गर्दीत घुसवून दहशतवादी हल्ल्याचा दुसरा प्रयत्न झाला. पण सर्तक असलेल्या पोलिसांनी वेळीच या हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले.
दुस-या हल्ल्यात सहा नागरीक आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. व्हॅनमधील पाचव्या हल्लेखोराला जखमी झाल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते पण त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असे स्पॅनिश पोलिसांनी सांगितले. कॅमब्रिल्स येथे गर्दीत गाडी घुसवणा-या हल्लेखोरांनी अंगाला स्फोटकांनी भरलेला पट्टा बांधला होता. रॅमब्लास सारखी इथेही हल्लेखोरांनी गर्दीत गाडी घुसवली असे कॅटालान इर्मजन्सी सर्व्हिसेसकडून सांगण्यात आलं.