वॉशिंग्टन : मुस्लिमांविरुद्ध वक्तव्य करून डोनाल्ड ट्रम्प हे त्या संघटनेत भरतीसाठी प्रमुख मदतगार ठरले आहेत, अशी टीका डेमोक्रॅट पक्षाच्या इच्छुक उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी केली आहे. ट्रम्प यांचा व्हिडिओ दाखवून ते लोक अधिक जिहादींची भरती करीत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. न्यू हॅम्पशायर येथे शनिवारी डेमोक्रॅट उमेदवारांची चर्चा झाली. त्यावेळी क्लिंटन यांनी ट्रम्प यांचा समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, धार्मिक कट्टरतावादाला अशाप्रकारे प्रतिक्रिया देणे हे अमेरिकेच्या अजिबात हिताचे नाही. अमेरिका सामाजिक सुधारणांच्या विरोधात आहे, असा संदेश जगभर गेला असून हा अमेरिका वा पाश्चात्त्यांनी इस्लामविरुद्ध रचलेला एक प्रकारचा कट आहे असाही अर्थ त्यांनी लावला आहे. त्यामुळे कट्टरतावादाला अधिक खतपाणी मिळण्याची शक्यता आहे असे मला वाटते. या चर्चेत ट्रम्प यांचे नाव वारंवार घेतले जात होते. इतर रिपब्लिकन उमेदवारांचा क्वचितच उल्लेख झाला. यावरून ट्रम्प हेच डेमोक्रॅट उमेदवाराचे प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याची बाब स्पष्ट झाली. आपल्या फाजील व हटवादी वक्तव्याने लक्ष वेधण्याची हातोटी ट्रम्प यांच्याकडे असून गुंतागुंतीच्या प्रश्नांची अतिशय सोपी उत्तरे असतात, असे त्यांना वाटते, अशी टीका त्यांनी केली.
ट्रम्प ‘त्या’ संघटनेला मदत करीत आहेत
By admin | Published: December 20, 2015 11:12 PM