अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ आज पूर्ण होणार आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आज राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून अखेरचं अमेरिकेच्या नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी ६ जानेवारी रोजी कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला. तसंच जो बायडेन यांना शुभेच्छा देत यशासाठी नशीबही त्यांचं साथ देवो अशी प्रार्थना, असं म्हणत सूचक इशाराही दिला. "संसंदेच्या परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर सर्वच जम भयभीत झाले होते. राजकीय हिंसाचार हा अमेरिकन नागरिकांच्या प्रत्येक बाबीवर होणारा हल्ला आहे. हे कधीही सहन केलं जाऊ शकत नाही," असं ट्रम्प म्हणाले. यादरम्यान त्यांनी विरोधकांना राजकीय द्वेषातून बाहेर येण्याचं आवाहनही केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणादरम्यान कोरोना विषाणूबाबतही भाष्य केलं. "चीन सोबत आपण नव्या रणनितीनुसार करार केले. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध झपाट्यानं बदलत होते. अमेरिकेतही अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात होती. परंतु कोरोना विषाणूनं आम्हाला निराळ्या दिशेनं जाण्यास प्रवृत्त केलं," असंही ट्रम्प यांनी नमूद केलं.
जाताजाता ट्रम्प यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, "नशीबही बायडेन यांना साथ देवो हीच प्रार्थना"
By जयदीप दाभोळकर | Published: January 20, 2021 8:45 AM
आज ट्रम्प यांचा कार्यकाळ होणार पूर्ण
ठळक मुद्देआज ट्रम्प यांचा कार्यकाळ होणार पूर्णजो बायडेन घेणार राष्ट्राध्यक्षपदाची शपथ